*हेडलाइन: दादर-माहिम समुद्र किनाऱ्याजवळचा परिसर तरीही दादर जगात ३ऱ्या क्रमांकावर प्रदूषित – समुद्राचा वारा कोणी अडवला?*
*उप-हेडलाइन: समुद्र फक्त ५०० मीटरवर – AQI २०३ – मुंबई AQI १७६ – जगात ३रे – मलबार हिल AQI ७५ vs दादर २०३ – भेदभाव!*
*मुंबई, दादर – २३ ऑक्टोबर २०२६:*
मुंबईचा नकाशा पाहा. दादर चौपाटी, शिवाजी पार्क, माहिम खाडी, गिरगाव चौपाटी, वरचा ग्रँट रोड – हा सगळा समुद्र किनारा पट्टा. हा पट्टा म्हणजे मुंबईचं हृदय. इथे असायला हवा होता AQI ५०.
*पण प्रत्यक्षात काय?*
दादरचा AQI २०३, माहिम १७५, माटुंगा १८०, गिरगाव १८०. आणि मुंबईचा सरासरी AQI १७६ – म्हणून मुंबई जगात ३ऱ्या क्रमांकाचं सर्वात प्रदूषित शहर!
समुद्र किनाऱ्याजवळचा परिसर असूनही हा भेदभाव का?
*कारण १: उंच इमारती – समुद्रावरून येणारी हवा अडवली!*
अरबी समुद्रावरून येणारा वारा गिरगाव-माहिम-दादर-ग्रँट रोडवरून थेट शहरात जायचा. म्हणून आधी संध्याकाळी गारवा असायचा.
आज प्रभादेवी-वरळीमध्ये ५० मजली टॉवर्सची चीनची भिंत उभी केली. सी फेस लुक म्हणून विकली, पण त्याच भिंतीने वारा अडवला. गिरगाव-ग्रँट रोडला SRA क्लस्टर टॉवर, माहिम खाडीची हवा BKC टॉवरने अडवली.
*कारण २: बांधकाम कचरा आणि वारे माप डेव्हलपमेंट नाही!*
DP २०३४ मध्ये वाऱ्याची दिशा मोजलीच नाही. वारा कुठून येणार, कुठे जाणार याचा अभ्यास न करता टॉवरला परवानगी. आणि बांधकाम कचरा – ट्रक भरून माती, धुरळा – रस्त्यावर, खाडीत. म्हणून AQI वाढला.
*कारण ३: निसर्ग संपदेबाबत अनास्था आणि भेदभाव!*
मनपाने हँगिंग गार्डनवर नैसर्गिक हवा-श्वासासाठी खूप काम केलं. मग दादर-माहिम-माटुंगा वंचित का?
महालक्ष्मी, पाली हिल, मलबार हिलमध्ये श्रीमंत राहतात – त्यांच्यासाठी तत्पर यंत्रणा. तिथे AQI ७५. आणि दादर-माहिम-माटुंग्यात मराठी माणूस – AQI २०३!
– गिल्बर्ट हिल – ६.६ कोटी वर्षांचा वारसा – फोडून विकला.
– ४५७ झाडे तोड प्रस्ताव – भांडुप १८४, वरळी ७६ – फक्त १० हजार दंड दिखावा – बैठक ६ ऑक्टोबर २०२६.
– झाडं मुळापासून का कोसळतात? बुंध्याभोवती सिमेंट, पादचारी मार्गात मुळं कापली, पाणी मिळत नाही, माती वाहून गेली.
*कारण ४: माती खाणं – नगरविकास मनपा फक्त माती खाते का?*
एक टॉवर खोदला – १०० ट्रक माती – एक ट्रक ५ हजार – ५ लाख खिशात! फूटपाथ झाडाच्या मुळाशी सिमेंट भरून माती बंद, झाड मेलं, मग तोडायचा पास – पुन्हा माती खाल्ली. खुल्या जागा DP मध्ये बाग दाखवून प्रत्यक्षात टॉवर.
म्हणूनच दादरचा सवाल:
*माती खाऊन झाल्यावर आता आमचा श्वास पण खाणार का? बिल्डरवर कारवाई मनपा करणार, पण मनपाच माती खात असेल तर मनपावर कारवाई कोण करणार?*
*कारण ५: कबुतर धुरळा – अतिरिक्त प्रदूषण*
दादर कबुतरखाना – विष्ठा, बुरशी Cryptococcus – फुफ्फुसावर हल्ला.
*मागणी:*
समुद्र जवळ असूनही श्वास बंद – वारा अडवला कोणी? मुंबईचे मारेकरी गजाआड करा! मुंबई वाचवा, माती वाचवा, वारा वाचवा, श्वास वाचवा – उच्च न्यायालयाने स्युमोटोने कारवाई करावी.
*- संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर, MAI MEDIA 24, https://maimedia24.com – मराठी माणसाचा सवाल – दादर स्टेशनवर लावा!*






















