Home मुंबई *श्री यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पितृपक्षासाठी अन्नदान – पाचवा...

*श्री यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पितृपक्षासाठी अन्नदान – पाचवा कार्यक्रम यशस्वी!*

33
0

*श्री यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पितृपक्षासाठी अन्नदान – पाचवा कार्यक्रम यशस्वी!*

*मुंबई

_श्री यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट_ तर्फे _पितृपक्षासाठी अन्नदान_ या उपक्रमातील पाचवा कार्यक्रम ट्रस्टच्या *यशोमंगल सभागृहात* मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमात *आर्यन शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना अन्नदानाच्या पाकिटांचे वाटप* करण्यात आले. आर्यन शाळेच्या *उज्ज्वला मॅडम आणि भोईर सर* या कार्यक्रमास उपस्थित होते.

ट्रस्टतर्फे *मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत जोशी* यांनी *उमेश थळे, सिद्धेश टिकेकर, धोंडीभाऊ हांडे आणि हिरेन छेडा* यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी केला.

या उपक्रमांतर्गत यावर्षी एकूण *सव्वाशे (१२५) विद्यार्थ्यांना धान्य वाटप* करण्यात आले.

ट्रस्टने सर्व दानशूर दात्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

*_गणपती बाप्पा मोरया_ 💐*

—
*संपादक : प्रा. शीतल हरीश करदेकर | https://maimedia24.com | मुंबई*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here