Home मुंबई *विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर;*

*विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर;*

30
0

*विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर;*
*विधान परिषदेच्या कामकाजाबाबत केली सविस्तर चर्चा*
कर्नाटक / मुंबई – विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर सध्या दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर असून, आज दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी कर्नाटकच्या विधान भवनाला भेट दिली.
कर्नाटक राज्याच्या विधान परिषद कामकाजनिमित्त आयोजित या अभ्यास दौऱ्यात उपसभापती सचिन अहिर यांनी कर्नाटक विधान परिषदेचे सभापती सलिम अहेमद आणि उपसभापती उमाश्री यांची सदिच्छा भेट घेतली. या सदिच्छा भेटीदरम्यान त्यांनी कर्नाटक विधान परिषदेच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली.
या बैठकीत महाराष्ट्र राज्याच्या धर्तीवर एक महत्त्वपूर्ण मुद्द्यावरही चर्चा झाली. महाराष्ट्र राज्यात विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांच्या विधिमंडळ कामकाजासाठी ‘डॅशबोर्ड प्रणाली’ यशस्वीपणे राबवली जात आहे. याच धर्तीवर अशीच आधुनिक डॅशबोर्ड प्रणाली कर्नाटक सरकारनेही आपल्या राज्यात लागू करावी, अशी सूचना उपसभापती सचिन अहिर यांनी केली. त्यावर कर्नाटक शासनाकडून या प्रस्तावाचा अत्यंत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन यावेळी मिळाले. तसेच, सलोख्याचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी उपसभापती सचिन अहिर यांनी कर्नाटक विधान परिषदेचे सभापती व उपसभापती यांना महाराष्ट्र विधान भवनाला भेट देण्याचे अधिकृत निमंत्रणही दिले.
याशिवाय, आपल्या कर्नाटक दौऱ्यात उपसभापती सचिन अहिर यांनी कर्नाटक राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री यू. टी. खादर यांचीही सदिच्छा भेट घेतली. या भेटीत आरोग्य क्षेत्रातील विविध उपक्रम व जनहिताच्या प्रश्नांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या महत्त्वाच्या अभ्यास दौऱ्यावेळी उपसभापती सचिन अहिर यांच्यासोबत महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाचे सचिव ३ डॉ. विलास आठवले प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here