महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR म्हणजेच विशेष सघन पुनरिक्षण मोहिमेअंतर्गत मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यात येत आहेत. प्रारूप यादीत ७ कोटी ७१ लाख मतदार दाखवण्यात आले आहेत, तर १ कोटी २२ लाख मतदारांना कागदपत्रांच्या त्रुटींमुळे नोटीस देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने या १ कोटी २२ लाख मतदारांची यादी राजकीय पक्षांना देण्याची मागणी केली होती, परंतु निवडणूक आयोगाने ती यादी प्रसिद्ध केलेली नाही. विधान परिषद निवडणुकीमुळे अनेक अधिकारी व्यस्त असल्याने SIR च्या कामावर परिणाम झाला आहे. या मोहिमेमुळे अंतिम यादीत सुमारे ७ कोटी ६९ लाख मतदार राहतील आणि २ कोटी ३० लाख नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहतील, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी केला आहे.
*तुम्ही अपडेट कशी करायची?*
१. तुमचे नाव आहे का ते तपासा: http://voters.eci.gov.in या वेबसाइटवर जा किंवा Voter Helpline App डाउनलोड करा. तिथे तुमचे नाव सर्च करा.
२. BLO ला भेटा: तुमच्या भागातील BLO म्हणजेच बूथ लेव्हल अधिकारी घरी येऊन कागदपत्रे घेत आहेत. त्यांना भेटून EF गणना प्रपत्र भरा.
३. नोटीस आली असेल तर: जर तुम्हाला Anomalies किंवा Unmapped म्हणून नोटीस आली असेल, तर आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रहिवासी पुरावा ही कागदपत्रे ताबडतोब जमा करा.
४. नाव वगळले असेल तर फॉर्म ६ भरा: जर तुमचे नाव यादीतून वगळले गेले असेल, तर तुम्ही पुन्हा नव्याने फॉर्म क्रमांक ६ भरून मतदार म्हणून नोंदणी करू शकता. हा फॉर्म ऑनलाईन किंवा BLO कडे मिळेल.
५. अंतिम तारीख लक्षात ठेवा: अंतिम यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी कागदपत्रे जमा करणे अत्यंत आवश्यक आहे.
┏━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━┓
┃ 🚩 MAI MEDIA 24 🚩 ┃
┃ मतदारांसाठी महत्त्वाची सूचना ┃
┗━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━┛
तुमचे नाव मतदार यादीत आहे का?
ताबडतोब तपासा!
१. voters.eci.gov.in वर जा
२. BLO ला भेटून कागदपत्रे द्या
३. नाव वगळले असेल तर फॉर्म ६ भरा
कागदपत्रे: आधार, मतदान कार्ड, रहिवासी पुरावा
वेळेत अपडेट करा – मतदानाचा हक्क !
✍️ संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर
MAI MEDIA 24
━━━━━━━━━━━━






















