Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग *कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करलेल्या पोलिसांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विनम्र अभिवादन*

*कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करलेल्या पोलिसांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विनम्र अभिवादन*

28
0

*कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करलेल्या पोलिसांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विनम्र अभिवादन*

*ठाणे पोलीस दलाच्या वतीने शहीद पोलिसांना मानवंदना*

ठाणे, ता. २१ :

देशाच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करलेल्या पोलीस अधिकारी व जवानांच्या शौर्याला नमन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा पोलिसांना विनम्र अभिवादन केले.
ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील निर्मलादेवी चिंतामण दिघे उद्यान येथे आयोजित पोलीस स्मृतिदिन संचलन कार्यक्रमात ते बोलत होते.

२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखमधील हॉट स्प्रिंग्स येथे चिनी सैन्याने भारतीय जवानांच्या गस्ती पथकावर हल्ला केला. या संघर्षात CRPFच्या १० जवानांनी देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी २१ ऑक्टोबरला पोलीस हुतात्म्यांना अभिवादन केले जाते.

१ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत देशातील विविध पोलीस दलांतील १५४ अधिकारी व अंमलदारांनी कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करले. या सर्व हुतात्मा पोलिसांना महाराष्ट्र शासन, ठाणे पोलीस आयुक्तालय आणि ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देश आणि समाजाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचे बलिदान देश सदैव स्मरणात ठेवेल. हुतात्मा पोलिसांचे शौर्य आणि कर्तव्यनिष्ठा संपूर्ण पोलीस दलासाठी प्रेरणादायी आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

पोलीस स्मृतिदिन हा हुतात्मा पोलिसांच्या त्यागाला नमन करण्याचा आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमानंतर त्यांनी ठाणे पोलीस दलातील शाहिद पोलिसांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

यावेळी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड आणि ठाणे पोलीस दलातील सर्व प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here