लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि पदवीधरांच्या न्याय्य हक्कांसाठी महाविकास आघाडीच्या विजयाचा निर्धार!
📍 चंद्रपूर | जिजाऊ सभागृह
आज चंद्रपूर येथील जिजाऊ सभागृहात महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
ही निवडणूक केवळ एका उमेदवाराच्या विजयाची नसून, लोकशाही विरुद्ध हुकूमशाही, समान हक्क आणि न्यायाच्या विचारांची लढाई आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची देशाप्रती असलेली समर्पित भावना आणि प्रत्येक नागरिकाला समान हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेला संघर्ष यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे.
पदवीधरांचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा आणि हक्कांना न्याय देण्यासाठी ॲड. अभिजित वंजारी हे सक्षम उमेदवार आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी एकसंघ होऊन मेहनत घेतली आणि प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत आपली भूमिका पोहोचवली, तर महाविकास आघाडीचा विजय निश्चित करण्यासाठी आपण प्रभावीपणे पुढे जाऊ शकतो.
या सभेला खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, काँग्रेस नेते आरिफ बेग, शहर काँग्रेस अध्यक्ष शिवा राव यांच्यासह विनायक बांगडे, राजेश अडूर, सचिन कत्याल, सुभाष गौर, अनिल शिंदे, अरुण धोटे, सुरेंद्र अडबाले, कुंदा जेणेकर, चंदा वैरागडे, विनोद दत्तात्रय तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
@wanjarri
#AbhijeetWanjari #NagpurGraduateConstituency #GraduateElection2026






















