Home महिला *कॅन्सरवर मात करणाऱ्या स्त्री शक्तींसोबत नवरात्र* *ॲड. नीलमताई शिर्के-सामंत यांचे नवदुर्गा पूजन:...

*कॅन्सरवर मात करणाऱ्या स्त्री शक्तींसोबत नवरात्र* *ॲड. नीलमताई शिर्के-सामंत यांचे नवदुर्गा पूजन: प्रो.शीतल हरीश करदेकर

78
0

*MAI MEDIA 24 | विशेष वृत्त*

*कॅन्सरवर मात करणाऱ्या स्त्री शक्तींसोबत नवरात्र*
*ॲड. नीलमताई शिर्के-सामंत यांचे नवदुर्गा पूजन*

*मुंबई:* नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. आणि खऱ्या स्त्री शक्तीचा दर्शन घ्यायचं असेल तर इंडियन कॅन्सर सोसायटीच्या रिहॅब सेंटरमध्ये जावं लागतं.

ॲड. नीलमताई शिर्के-सामंत यांनी यंदाचं नवरात्र कॅन्सरवर मात करणाऱ्या रणरागिणींसोबत साजरं केलं. सेंटरमधील सखींसोबत संवाद साधताना त्यांनी त्यांचा संघर्ष, जिद्द आणि पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा जवळून ऐकली.

इंडियन कॅन्सर सोसायटीच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सन्मान समारंभात नीलमताईंनी सहभाग घेतला. तसेच नविन्या वर्कशॉपला भेट देऊन तिथल्या महिलांनी बनवलेल्या उत्पादनांची पाहणी केली. स्वावलंबनातून आत्मसन्मानाकडे जाणारा हा प्रवास खऱ्या अर्थाने नवदुर्गा पूजन आहे, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

*MAI MEDIA 24 | वृत्त: जे सत्य सांगते.*
*संपादक – प्रो. शीतल हरीश करदेकर*

#MAIMEDIA24 #NeelamShirkeSamant #CancerWarriors #Navratri #IndianCancerSociety75 #Mumbai

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here