Home मुंबई *ग्रंथालय टिकवून ठेवणे काळाची गरज – उपसभापती सचिन अहिर*

*ग्रंथालय टिकवून ठेवणे काळाची गरज – उपसभापती सचिन अहिर*

53
0

*ग्रंथालय टिकवून ठेवणे काळाची गरज – उपसभापती सचिन अहिर*
*’वाचन प्रेरणा दिनानिमित्त उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते ‘अर्थशास्त्र परिभाषा कोष’चे प्रकाशन*
मुंबई – ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात आणि हा अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आज ग्रंथालये टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी केले.
राज्याच्या मराठी भाषा विभागाच्या भाषा संचालनालयतर्फे ‘वाचन प्रेरणा दिन २०२६’ निमित्त शासकीय विधी महाविद्यालय येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
याप्रसंगी उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते ‘अर्थशास्त्र परिभाषा कोष’चे प्रकाशन करण्यात आले. तसेच, वाचन संस्कृती जोपासणाऱ्या आणि समृद्ध करणाऱ्या वाचक प्रेरकांचा सत्कारही त्यांच्या हस्ते करण्यात आला. मराठी भाषेचा वारसा जपत तिला ज्ञानभाषा म्हणून विकसित करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम कौतुकास्पद आहेत, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी कामगार चळवळीतील आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रीय मजदूर मिल संघाचे संस्थापक डॉ. ग. द. आंबेकर यांनी कामगारांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी ग्रंथालयाची स्थापना केली होती. ती परंपरा आजही आपण सुरू ठेवल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ग्रंथालयांच्या निगराणीसाठी आणि ग्रंथांच्या संरक्षणासाठी मिळणारे अनुदान अपुरे असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी भाषा मराठी भाषा विभागाचे उपसचिव, डॉ. नामदेव भोसले, भाषा संचालक, डॉ. अरुण गीते, प्राचार्य, डॉ. अस्मिता वैद्य, समीक्षक, डॉ . नितीन रिंढे , डॉ.विजय ककडे, कार्यक्रम सन्मवयक डॉ. राहुल गांगुर्डे इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here