Home मुंबई *१८ तालुक्यांमध्ये ‘ग्राऊंड ट्रथिंग’ला मंजुरी* *•प्रमुख ५ पिकांचे २०...

*१८ तालुक्यांमध्ये ‘ग्राऊंड ट्रथिंग’ला मंजुरी* *•प्रमुख ५ पिकांचे २० टक्के सर्वेक्षण*

33
0

*१८ तालुक्यांमध्ये ‘ग्राऊंड ट्रथिंग’ला मंजुरी*

*•प्रमुख ५ पिकांचे २० टक्के सर्वेक्षण*

मुंबई, दि ९ : राज्यातील ट्रिगर-१ व्यतिरिक्त आणखी १८ तालुक्यांमध्ये ‘ग्राऊंड ट्रथिंग’ (प्रत्यक्ष शेतावर जाऊन सर्वेक्षण) करून प्रमुख ५ पिकांचे २० टक्के प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
राज्यात जून ते सप्टेंबर २०२६ दरम्यान झालेल्या पावसाची तूट व इतर प्रतिकूल घटकांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत, महसूलमंत्री व दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या निर्देशावरून मदत व पुनर्वसन विभागाने मान्यता दिली आहे.

शासनाने यापूर्वीच खरीप २०२६ च्या हंगामातील परिस्थितीच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू केल्या आहेत. मात्र, या व्यतिरिक्त इतर काही तालुक्यांमध्येही दुष्काळाची तीव्रता निदर्शनास आल्याने २९ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली होती.

‘ग्राऊंड ट्रथिंग’ करण्यात येणारे १८ तालुके असे –

*छत्रपती संभाजीनगर विभाग:*
* नांदेड जिल्हा : मुदखेडा आणि मुखेड

*नागपूर विभाग:*
* चंद्रपूर जिल्हा: जिवती, ब्रम्हपूरी आणि बल्लारपूर
.
* गोंदिया जिल्हा: आमगांव, देवरी, सालेकसा आणि गोंदिया

* वर्धा जिल्हा : कारंजा

* भंडारा जिल्हा : मोहाडी आणि तुमसर.

*नाशिक विभाग:*

* नाशिक जिल्हा : त्र्यंबकेश्वर, चांदवड आणि निफाड.

*पुणे विभाग*

* सातारा जिल्हा : पाटण.

* सांगली जिल्हा: शिराळा आणि वाळवा
या सर्व १८ तालुक्यांमध्ये प्रमुख ५ पिकांचे २० टक्के क्षेत्रात ‘ग्राऊंड ट्रथिंग’ पूर्ण करण्यात येणार असून याबाबत तेथील जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आल्याचे मंत्री बावनकुळे म्हणाले
—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here