Home मुंबई दुष्काळी परिस्थितीचा आढावा व शेतकऱ्यांशी संवादासाठी मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांचा मराठवाडा...

दुष्काळी परिस्थितीचा आढावा व शेतकऱ्यांशी संवादासाठी मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांचा मराठवाडा दौरा

37
0

📢 दुष्काळी परिस्थितीचा आढावा व शेतकऱ्यांशी संवादासाठी मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांचा मराठवाडा दौरा

दिनांक : ७ ते ९ ऑक्टोबर २०२६

शिवसेना नेत्या, सदस्या तथा माजी उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद आणि PCPNDT व MTP कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कृती दलाच्या अध्यक्ष मा. डॉ. नीलम गोऱ्हे या छत्रपती संभाजीनगर, बीड, उदगीर व लातूर दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्यात दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी, पाणीटंचाई व पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता याबाबत आढावा घेऊन शेतकरी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच महिला ऊसतोड कामगारांचे आरोग्य व PCPNDT अंमलबजावणीबाबत बैठक घेणार आहेत.

🗓️ बुधवार, ७ ऑक्टोबर | छत्रपती संभाजीनगर

▪️ रात्री ८.४५ ते ९.३० : शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांशी अनौपचारिक भेट.
📍 ITC रामा इंटरनॅशनल हॉटेल.
▫️ विमानाच्या आगमनानुसार भेटीच्या वेळेत बदल होऊ शकतो.

🗓️ गुरुवार, ८ ऑक्टोबर | बीड व उदगीर

▪️ सकाळी १०.०० : मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा वाटप.
📍 इमामपूर, ता. व जि. बीड.
▫️ आयोजक : श्री. बाजीराव चव्हाण, युवासेना मराठवाडा निरीक्षक व युवासेना लोकसभा संपर्क प्रमुख, बीड.

▪️ सकाळी १०.३० ते ११.४५ : PCPNDT अंमलबजावणी व महिला ऊसतोड कामगारांच्या आरोग्यविषयक प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक.
📍 जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय परिसर, बीड.

▪️ दुपारी ४.०० : शेती पाहणी व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी संवाद.
📍 करडखेल पाटी, ता. उदगीर.

▪️ सायंकाळी ५.०० : दुष्काळ, पाणीटंचाई व चाऱ्याच्या प्रश्नांबाबत श्री. सुधाकर भालेराव व शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा.
📍 श्री. सुधाकर भालेराव यांचे कार्यालय, उदगीर.

🗓️ शुक्रवार, ९ ऑक्टोबर | लातूर

▪️ सकाळी १०.३० : दुष्काळी परिस्थिती व स्थानिक प्रश्नांबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक.
📍 हाय टाऊन (Hi Town), ऑफिसर्स क्लब, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उजव्या बाजूला, लातूर.
▫️ स्थानिक समन्वय : श्री. सचिन दाने, शिवसेना जिल्हाप्रमुख, लातूर.

▪️ सकाळी ११.३० ते दुपारी १.४५ : दुष्काळ निवारण मंचाच्या बैठकीस उपस्थिती व मार्गदर्शन.
📍 भालचंद्र ब्लड बँक सभागृह, गांधी मार्केट, लातूर.

पत्रकार बांधव, शिवसेना व महिला आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दौऱ्याची नोंद घेऊन स्थानिक कार्यक्रमांसाठी समन्वय साधावा. दुष्काळ, पाणी व चाऱ्याबाबत स्थानिक प्रश्नांची संक्षिप्त निवेदने तयार ठेवावीत. शासकीय बैठकीतील उपस्थिती प्रशासनाच्या समन्वयाने राहील.

संपर्क :
योगेश जाधव : ९०२८३३३३०५
रवींद्र बारस्कर : ९८८१८१५८०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here