Home पुणे *लोहगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांची पीडितेच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून...

*लोहगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांची पीडितेच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून चर्चा*

39
0

*लोहगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांची पीडितेच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून चर्चा*

*स्त्री आधार केंद्राच्या वतीने पोलीस ठाण्यात आणि पीडितेच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांना दिला धीर*

पुणे, दि. २ ऑक्टोबर पुण्यातील लोहगाव परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेची शिवसेना नेत्या तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पीडितेच्या पालकांशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्ते श्रीमती अनिता फडतरे-शिंदे आणि राखी सिंघवी संबंधित पोलीस ठाण्याला भेट देण्यात आली. तसेच पीडितेच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेण्यात आली. या वेळी दूरध्वनीद्वारे डॉ नीलम ताई गोऱ्हे यांनी कुटुंबीयांची विचारपूस करून त्यांना मानसिक आधार देण्यात आला. प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांकडून माहिती घेण्यात आली.
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये पीडितेला न्याय मिळवून देण्याबरोबरच तिचे आणि तिच्या कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा घटनांमध्ये पीडित कुटुंबाला एकटे पडू न देता त्यांना आवश्यक समुपदेशन, कायदेशीर मदत आणि सामाजिक आधार मिळणे गरजेचे आहे, अशी भूमिका डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडली.
या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे आणि जलदगतीने पूर्ण करून आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणीही डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. पीडित बालिकेची ओळख गोपनीय ठेवून तिच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी स्त्री आधार केंद्र सातत्याने पाठपुरावा करणार असून, पीडित कुटुंबाला आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here