Home उद्योग / शिक्षण वार्ता विडी कामगार व कारखानदार यांची प्रश्न त्वरित मार्गी लागण्यासाठी हक्क समिती कामगार...

विडी कामगार व कारखानदार यांची प्रश्न त्वरित मार्गी लागण्यासाठी हक्क समिती कामगार मंत्र्यांना भेटणार .

49
0

विडी कामगार व कारखानदार यांची प्रश्न त्वरित मार्गी लागण्यासाठी हक्क समिती कामगार मंत्र्यांना भेटणार .
******************************
विडी कामगारांना न्याय मिळावा व कारखानदारांचे उद्योग टिकण्यात यावा, त्यासाठी कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब यांना ,कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णुकारमपुरी महाराज ,राष्ट्रवादी कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू नव,महाराष्ट्र कामगार युनियनचे अध्यक्ष सायबण्णा तेग्गेळ्ळी,राष्ट्रीय विडी मजदूर संघ इंटकचे अध्यक्ष राहुल गुजर, यांच्या संयुक्त पणे ६ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे भेट घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब यांनी ३ ऑगस्ट रोजी सोलापूर सह महाराष्ट्र राज्यातील विडी कामगारांना किमान वेतन ३७९ मजुरी वाढ करण्यात आले. तेव्हापासून सोलापूर शहरातील विडी कारखानदारांनी विडी कामगारांना तेवढे मजुरी देणे परवडत नाही आम्ही विडी कारखाने इतर राज्यात हलवू अशी भूमिका घेऊन काही विडी कारखानदारांनी कामगारांना, देखील कपात करीत आहेत, त्यामुळे विडी कामगारांमध्ये संभ्रमावस्था व भीती निर्माण झाली आहे .
आता मोठमोठे सण येत असल्यामुळे एकीकडे कारखाने कुठे बंद होणार या भीतीत कामगार आहेत ‌.
तरी मा. कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेबांना विडी कामगार हक्क कृती समितीच्या वतीने ६ ऑक्टोबर रोजी मुंबईत भेट घेऊन सध्या उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती देऊन जेणेकरून विडी उद्योग टिकला पाहिजे व विडी कामगारांना काम देखील पुरेसे मिळावे , आणि कामगारांना देखील मजुरी योग्य मिळाला पाहिजे कारण सध्या सोलापूर शहरातील अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत .त्या दृष्टीने कामगार व उद्योगाची विचार करणे जरुरी आहे ,अशी माहिती देऊन उद्भवलेल्या परिस्थितीतून मार्ग आपणच काढू शकता असे विनंती विडी कामगार किमान वेतन हक्क कृती समितीच्या वतीने करणार आहोत ,असे हक्क समितीच्या वतीने डॉक्टर गोवर्धन सुंचू , विष्णू कारमपुरी, सायबांन्ना तेगेळ्ळी , राहुल गुजर. यांनी संयुक्त पत्रक प्रसिद्धी दिली आहे.
=======================

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here