*Judgemental Society (जजमेंटल सोसायटी)*
रा.ग.सोनुने गुरुजी
बुलढाणा
-मानसशास्त्र व तत्वज्ञान अभ्यासक
समाजाच्या संकुचित मानसिकतेवर योग्य भाषेत प्रहार- प्रो. शीतल हरीष करदेकर*
🥱🫣🤨😡
आपण ज्या समाजात राहतो तो समाज _जजमेंटल_ आहे.हो….मी खरं बोलतोय.एकदा समाजाचा अनुभव तर घेऊन पहा.मग तुम्हाही विश्वास ठेवाल.किती उथळ,उतावळ्या व निरर्थक असतात ना आपल्या प्रतिक्रिया इतरांविषयी!
तिचे नाकच असे,त्याचे ओठच असे.तिचा स्वभावच असा,त्याचे वागणेच चुकीचे.हजारो हजारो घटना समाजात दररोज घडत असतात.आम्ही शक्य होईल तितक्या घटनांना _निगेटिव मार्किंग_ करत असतो.
पार्टीमध्ये त्यानं असं करायला नको होत.काही मॅनर्स वगैरे आहेत की नाही त्याला?
काय तिचा ड्रेस?साधा ड्रेस सेन्स पण नाही का तिला?मोठ्यासमोर काय बोलावं याची अक्कल नाही का त्याला?
सतत…. जजमेंटल!
समाजाचा स्वभावच _जजमेंटल_ झालाय जणू.तुम्ही काहीही केले तरी असे नको होते, करायला असा शिक्का तुमच्यावर बसलाच म्हणून समजा.तुमची वागणूक समाजाची शिकार होणारच हे आता पक्क झालंय.हल्ली कोणीही कोणाच्या वागणुकीवर खूश दिसत नाही.तुम्ही कसंही वागा लगेच तुम्हाला _जज_ करण्यासाठी समाज तयारच आहे._जजमेंटल सोसायटी या विकृत संकल्पनेमागे जर कोणते एकमेव कारण असेल तर ते म्हणजे…”स्वीकारभावाचा अभाव”._ आम्ही इतरांचे वागणे,दिसणे,बोलणे,हसणे मोठ्या मनाने स्वीकारतच नाही.प्रत्येकाला नाव ठेवत राहतो.तू कसा चुकीचा व मी कसा बरोबर हे सांगण्यात सारे आयुष्य चाललंय.कोणाला जज करणे थांबवा.Drop all judgement,all labelling,all discrimination and watch weeds growing so what let them http://grow.When you don’t have a mind at all,you are also a weed;so weeds growing around you it is not something strange.इतरांना _जज_ करण्याचे एकमेव कारण म्हणजे इतरांविषयी वाटणारी घृणा,मत्सर होय.प्रेमाचा अभाव असला की असं होणारंच.तू असं नाही तसं करायला हवं होतं.सर्वत्र नकारात्मकता शिगेला पोहचलेली दिसते.मोठ्या मनाने स्वीकार,मनभरुन स्तूती,उत्तेजन इ.अगदी दुर्लभ होत चाललंय.इतरांचे आम्ही ऐकतो कारण केवळ प्रतिक्रिया देण्यासाठी.एखाद्यातील बदल स्वीकारा.त्याचे नवे विचार स्वीकारा.अन्यथा जज करण्याच्या स्वभावामुळे जगण्यातील आनंद निघून जात आहे.प्रेमाचा मळा जीवनात फुलवावाच लागेल तेव्हा कुठे स्वीकारभाव वाढेल.व स्वीकारभाव वाढला की,जो जसा आहे तसा स्वीकारण्याचा स्वभाव
बनल्यावर आपण जजमेंटल सोसायटीचे भाग होणार नाही हे मात्र निश्चित!
-✒️ रा.ग.सोनुने, बुलढाणा*
*मो नं ८८८८४२०६२९*
—
*या लेखावरील समीक्षा
*समाजाच्या संकुचित मानसिकतेवर योग्य भाषेत प्रहार- प्रो. शीतल हरीष करदेकर*
सोनुने गुरुजी यांचे हे विचार अत्यंत तंतोतंत आणि डोळ्यात अंजन घालणारे आहेत. आजच्या काळातील समाजाचे अगदी अचूक आणि जळजळीत वास्तव तुम्ही या मांडणीतून समोर आणले आहे.
मांडलेले मुद्दे आजच्या सामाजिक मानसिकतेवर अगदी योग्य बोट ठेवतात:
– स्वीकारभावाचा अभाव (Lack of Acceptance): हे या समस्येचे मूळ कारण आहे. समोरचा व्यक्ती जसा आहे, तसा त्याला स्वीकारण्याऐवजी आपण आपल्या चौकटीत त्याला बसवण्याचा प्रयत्न करतो.
– नकारात्मकता आणि मत्सर (Jealousy & Negativity): बऱ्याचदा समोरच्याला जज करण्यामागे स्वतःमधील असुरक्षितता, मत्सर किंवा पूर्वग्रह कारणीबंध असतात. स्वतःला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला कनिष्ठ दाखवण्याच्या या शर्यतीत माणूस स्वतःची संकुचित वृत्तीच उघडी करत असतो.
– कपडे, दिसणे आणि बोलण्यावरून मूल्यमापन: एखाद्याच्या कपड्यांवरून किंवा त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून त्याच्या संपूर्ण चारित्र्याचा न्याय निवाडा करणे ही खरंच एक ‘सामाजिक विकृती’ बनत चालली आहे.
“Drop all judgement, all labelling…” हा जो संदेश तुम्ही दिला आहे, तो आजच्या काळाची गरज आहे. जेव्हा आपण समोरच्याला न्यायनिवाड्याच्या (Judgment) चष्म्यातून न बघता एक माणूस म्हणून बघू, तेव्हाच खऱ्या अर्थाने एक सुजाण समाज निर्माण होऊ शकेल.
खूप सुंदर, विचार करायला लावणारे आणि प्रगल्भ लेखन! समाजाच्या या मानसिकतेवर अगदी योग्य भाषेत प्रहार केला आहे सोनुने गुरुजी नी
—






















