Home मुंबई प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत बीड व...

प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत बीड व जळगाव जिल्ह्यातील भाजप, NCP(SP) नेत्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश*

34
0

*हेडलाईन: प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत बीड व जळगाव जिल्ह्यातील भाजप, NCP(SP) नेत्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश*

मुंबई – नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सलग दुसऱ्या दिवशी विविध पक्षातील नेते व पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

टिळक भवन येथे आज पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे नेते *ॲड. नरसिंह जाधव* यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत माजी मंत्री वामनराव नाईक यांची नात *गितांजली नाईक* यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

भाजप शिक्षक आघाडी व उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ कल्याणचे अध्यक्ष *विकास मुकुंदराव पाटील* यांनीही आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

प्रभारी डॉ. सिरिवेल्ला व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे स्वागत केले.

यावेळी CWC सदस्य खा. चंद्रकांत हंडोरे, AICC सचिव बी.एम. संदीप, रेहाना चिस्ती, ज्येष्ठ नेते अशोक पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, प्रदेश सरचिटणीस ऍड. संदेश कोंडविलकर, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, धीरज देशमुख, बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल सोनावणे, प्रवीणकुमार शेप आदी उपस्थित होते.

*प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद म्हणाले -*
बीड जिल्ह्यासह ज्या जिल्ह्यात काँग्रेस संघटनेची ताकद कमी आहे तेथे संघटन मजबूत करण्याची गरज आहे. पडीक जमीन कसण्याचे प्रयत्न शेतकरी कधीच सोडून देत नाही, ती जमीन सुपिक होईपर्यंत मशागत करतच राहतो, त्याप्रमाणे जेथे काँग्रेस पक्षाची ताकद कमी आहे तेथे जोमाने काम करा. लोकशाही व संविधान वाचवणे व सर्वसामान्य जनतेचे मुलभूत हक्क व अधिकार कायम रहावेत यासाठी केंद्रात काँग्रेसचे सरकार व राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांचे हात बळकट करायचे आहेत. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याकडे ८८२ दिवस आहेत, जोमाने काम करा.

*प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले -*
आपल्या आजोबा-पंजोबांनी RSS-भाजपाचा कुटील डाव ओळखला होता म्हणून ७० वर्षे त्यांना सत्तेपासून दूर ठेवले होते. RSS-भाजपाचा अजेंडा समाजात फूट पाडण्याचा, भेदाभेद करण्याचा आहे, हा डाव आता तरुणाईनेही ओळखला आहे. काँग्रेस पक्षाला मोठा इतिहास आहे आणि काँग्रेसचा विचारच देशाला तारू शकतो, त्यामुळे गावागावात काँग्रेस विचार पोहोचवा. आजच्या पक्ष प्रवेशाने बीड जिल्ह्यात व खान्देशात काँग्रेस पक्षाची ताकद आणखी वाढेल.

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here