Home मुंबई *दादासाहेब फाळके चित्रनगरीसाठी मानखुर्दची १४ एकर जमीन*

*दादासाहेब फाळके चित्रनगरीसाठी मानखुर्दची १४ एकर जमीन*

49
0

*दादासाहेब फाळके चित्रनगरीसाठी मानखुर्दची १४ एकर जमीन*

*बाह्य चित्रिकरणासाठी सांस्कृतिक कार्य विभागाला जमीन देण्यास शासनाची मान्यता*

*महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार*

*मुंबई, दि. २ ऑक्टोबर २०२६*
दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या बाह्य चित्रिकरणासाठी मुंबईतील मानखुर्द येथील सुमारे १४ एकर शासकीय जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला देण्यास महसूल विभागाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मौजे मानखुर्द, ता. कुर्ला येथील सर्व्हे क्रमांक १३८ पैकी तसेच लगतच्या मिळकतीतील अंदाजे १४ एकर म्हणजेच सुमारे ५६ हजार ६६६ चौ.मी. जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला बाह्य चित्रिकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जमीन महाराष्ट्र जमीन महसूल जमीन संहिता, १९६६ मधील कलम ४० नुसार प्राप्त अधिकारात महसूलमुक्त व भोगाधिकार मूल्यरहित किमतीने देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीला आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. दादासाहेब फाळके यांच्या नावाने असलेल्या चित्रनगरीच्या विकासासाठी बाह्य चित्रिकरणासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देताना शासनाने सार्वजनिक हित आणि जमिनीचा नियोजनबद्ध वापर यांचा समतोल साधला आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here