Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग कांचन डिजिटल फोटो घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२६ – बक्षीस वितरण थाटात...

कांचन डिजिटल फोटो घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२६ – बक्षीस वितरण थाटात संपन्न!*

45
0

*कांचन डिजिटल फोटो घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२६ – बक्षीस वितरण थाटात संपन्न!*

रत्नागिरी : कांचन डिजिटल फोटो आणि रत्नागिरी नगरपरिषद आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२६ चा भव्य बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी राजापूरचे लोकप्रिय आमदार *किरण (भैय्या) सामंत* यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी आयोजक *कांचन मालगुंडकर आणि गौरांग आगाशे* यांच्या सुंदर नियोजनाचे विशेष कौतुक केले.

या सोहळ्यास नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे, श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे, नगरसेवक विजय खेडेकर, उद्योजक प्रसन्नशेठ आंबुळकर, रक्षाताई घाग आदी मान्यवर उपस्थित होते.

*यंदाचे विजेते:*
*चलचित्र विभाग प्रथम :* संदीप मेस्त्री (सडेवाडी-जयगड) – “श्री स्वामी समर्थांचा दिव्य प्रकटावतार”
*आरास / सजावट विभाग प्रथम :* अनिकेत सुपल (सह्याद्रीनगर-नाचणे) – “बारा ज्योतिर्लिंग”

विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

@Shivsenaofc

#GanpatiDecorationContest #Ratnagiri #Ganeshotsav2026 #KiranSamant #KanchanDigitalPhoto #MAIMEDIA24

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here