Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग *रत्नागिरीच्या पर्यटन विकासाला नवी दिशा! १५ पर्यटन मित्रांचा मंत्री उदय सामंत यांच्या...

*रत्नागिरीच्या पर्यटन विकासाला नवी दिशा! १५ पर्यटन मित्रांचा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान*

47
0

*रत्नागिरीच्या पर्यटन विकासाला नवी दिशा! १५ पर्यटन मित्रांचा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान*

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था, समृद्ध मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स (मुंबई) आणि पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री मा. श्री. उदय सामंत यांच्या हस्ते पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १५ पर्यटन मित्रांचा सन्मान करण्यात आला. वैद्यकीय पर्यटन, होम स्टे, हॉटेल व्यवसाय, पर्यटन मार्गदर्शन, फोटोग्राफी, पत्रकारिता, साहसी पर्यटन, स्थानिक कला-संस्कृती या विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा यात गौरव झाला.

यावेळी आमदार किरण सामंत, आमदार प्रमोद जठार, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जि.प. CEO वैदेही रानडे, राजू भाटलेकर, संजय यादवराव, संतोष गांगण, डॉ. श्रीधर ठाकूर, पर्यटन तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर निमकर आदी मान्यवर उपस्थित होते.

*Source:*
FB: https://www.facebook.com/share/p/1doaV3hSNR/
Insta: https://www.instagram.com/p/DdyVyBEjtLo/
X: https://x.com/samant_uday/status/2104146568719020307

#UdaySamant #RatnagiriTourism #WorldTourismDay #ParyatanMitra #KonkanTourism #Ratnagiri #MAIMEDIA24 #Proshittalkardekar #ShittalKardekar
—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here