*कामगार क्रीडा भवनाची कन्या सोनम मस्करची आशियाई स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी! भारताला मिळवून दिले पहिले रौप्य*
*मुंबई :* कामगार कुटुंबातून आलेल्या आणि कामगार क्रीडा भवनात घडलेल्या नेमबाज सोनम मस्कर हिने जपानमध्ये भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या *२० व्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६* मध्ये महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारताला रौप्य पदक मिळाले असून, हे या स्पर्धेतील भारताचे पहिलेच पदक ठरले आहे. या यशात सोनमचा सिंहाचा वाटा आहे.
भारतीय संघाने एकूण १८९८.० गुण मिळवले, त्यापैकी एकट्या सोनमने *६३४.१ गुण* मिळवत सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी केली.
*कामगार कुटुंबातील प्रेरणादायी प्रवास:*
सोनम सध्या पश्चिम रेल्वेत कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे. तिचे वडील महानंद वितरक सहकारी पतसंस्थेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. तिने दिल्ली, कोल्हापूरसह आपल्या हक्काच्या *मुंबईतील कामगार क्रीडा भवनाच्या शूटिंग रेंजमध्ये* सराव केला आहे.
मुंबई शहर जिल्हा नियोजन निधीतून उभारण्यात आलेली ही रेंज महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने चालवली जाते. कामगार कुटुंबातील मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळावे, हाच यामागचा उद्देश होता आणि तो आज सोनमने खरा करून दाखवला.
या चमकदार कामगिरीबद्दल कामगार मंत्री *ॲड. आकाश फुंडकर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, प्रधान सचिव आय. ए. कुंदन, उपसचिव रोशनी कदम पाटील, कल्याण आयुक्त भास्कर मोरडे, उपकल्याण आयुक्त नंदलाल राठोड* यांनी सोनम आणि संपूर्ण भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.
*MAI MEDIA 24 कडून सोनमचे हार्दिक अभिनंदन!*
#SonamMaskar #AsianGames2026 #AichiNagoya2026 #SilverMedal #TeamIndia #IndianShooting #10mAirRifle #MumbaiPride #KamgarKridaBhavan #MAIMEDIA24






















