Home नाशिक *मुख्यमंत्री फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजार जडला आहे : हर्षवर्धन सपकाळ*

*मुख्यमंत्री फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजार जडला आहे : हर्षवर्धन सपकाळ*

83
0

*मुख्यमंत्री फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजार जडला आहे : हर्षवर्धन सपकाळ*

*फडणवीस निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का? – काँग्रेसचा सवाल*

*मुंबई, दि. २७ सप्टेंबर २०२६ :*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहुल गांधींवर टीका करण्याचा जणू आजारच जडला आहे. निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देत आहेत? ते निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का? असा थेट सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांमुळे निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दोन निवडणूक आयुक्तांनी लेखी स्वरूपात उपस्थित केलेल्या आक्षेपांमुळे मतचोरीवर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा सपकाळ यांनी केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यांत आठ टक्के मतदार वाढल्याचा मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता, त्यामुळेच फडणवीसांनी राहुल गांधींचा धसका घेतल्याचे सपकाळ म्हणाले.

*”मुघलांच्या घोड्यांना पाण्यातही संताजी-धनाजी दिसत होते, तशी अवस्था फडणवीसांची झाली आहे. त्यांना प्रत्येक प्रश्नात राहुल गांधीच दिसतात,”* असा टोला सपकाळ यांनी लगावला.

राज्यातील शेतकरी, बेरोजगार तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी राहुल गांधींवर टीका करणे हाच सरकारचा एकमेव कार्यक्रम झाल्याची टीका त्यांनी केली.

निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित झाले असतील तर त्याची उत्तरे आयोगाने द्यावीत, मुख्यमंत्र्यांनी आयोगाची बाजू मांडण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देणे महत्त्वाचे असल्याचे सपकाळ म्हणाले.

राहुल गांधींच्या मेंदूची चिंता करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्ज, उद्ध्वस्त पिके आणि दुष्काळग्रस्तांना मदत कधी मिळणार, चारा छावण्या कधी सुरू होणार याचे उत्तर द्यावे. हे जमत नसेल तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून काम करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

#HarshwardhanSapkal #DevendraFadnavis #RahulGandhi #MaharashtraPolitics #Congress #ElectionCommission #MAIMEDIA24

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here