*रत्नागिरीत विद्यार्थ्यांच्या कला-गुणांचा उत्सव; ५०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग*
*रत्नागिरी :* बालरंगभूमी परिषद, रत्नागिरी शाखा आणि श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मारुती मंदिर सर्कल, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दैवज्ञ भवन, रत्नागिरी येथे भव्य चित्रकला स्पर्धा, गणेशमूर्ती बनवणे स्पर्धा आणि अथर्वशीर्ष पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ५०० हून अधिक विद्यार्थी स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्रातील सारेगमप सीझन वनचे विजेते गायक अभिजीत कोसंबी यांच्या विशेष उपस्थितीत उत्साहात पार पडला.
*स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -*
*१) चित्रकला स्पर्धा*
*अ गट*
सर्वोत्कृष्ट – ओम कोतवडेकर, उत्कृष्ट – युक्ता गावखडकर, उत्तम – श्लोक पडवेकर, उत्तेजनार्थ – खेमराज गुप्ता, रुद्र झाडगावकर
*ब गट*
सर्वोत्कृष्ट – ओम तोडणकर, उत्कृष्ट – वरद गावखडकर, उत्तम – संतोष गोरिवले, उत्तेजनार्थ – किमया साखळक
*क गट*
सर्वोत्कृष्ट – आराध्या कांबळे, उत्कृष्ट – सार्थक नितीन खडपे, उत्तम – सृष्टी चव्हाण
*लहान गट*
सर्वोत्कृष्ट – शहाजैन गोलंदाज, उत्कृष्ट – सार्थक खडपे, उत्तम – सृष्टी चव्हाण
*२) गणेशमूर्ती बनवणे स्पर्धा*
*अ गट -* सर्वोत्कृष्ट – सार्थक खडपे, उत्कृष्ट – आराध्य झगडे, उत्तम – अनय पराग राहते
*ब गट -* सर्वोत्कृष्ट – ओमकार तोडणकर, उत्कृष्ट – अर्णव कारेकर, उत्तम – स्वराज गोतड, उत्तेजनार्थ – श्रावणी ठेंगील
*क गट -* सर्वोत्कृष्ट – शाल्व कारेकर, उत्कृष्ट – हर्ष कुसाळकर, उत्तम – स्वराज भाटकर, उत्तेजनार्थ – निधी कदम, श्री कांबळे
*३) अथर्वशीर्ष पठण स्पर्धा*
*अ गट -* सर्वोत्कृष्ट – तन्मय फडके, उत्कृष्ट – गौरी नेवरेकर, उत्तम – अवनी पेटकर
*ब गट -* सर्वोत्कृष्ट – त्रिशा नेवरेकर, उत्कृष्ट – अर्णव प्रभुदेसाई, उत्तम – अथर्व शिर्के
*क गट -* सर्वोत्कृष्ट – निल जोशी
या विविध स्पर्धांसाठी श्री. मकरंद दामले, सौ. भिडे, श्री. रुपेश पंगेरकर, श्री. निरंजन सागवेकर आणि श्री. संग्राम भालकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
यावेळी बालरंगभूमी परिषद, रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, उपाध्यक्ष राजेश गोसावी, कार्यवाहक सीमा कदम, यूथ राज्य संघटक शहबाज गोलंदाज तसेच स्वरूप शिरसेकर, सागर सकपाळ, यश सुर्वे, आदित्य खाडे, सई कदम, शिवांगी आखाडे, दत्ता केळकर आणि श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक मित्र मंडळाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे आणि संस्कारक्षम वातावरणातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आयोजकांसाठी विशेष आनंदाची बाब ठरली.
#maimedia24 #ratnagiri #balrangbhoomi






















