Home मुंबई *राज्यातील बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; लालबागच्या राजा चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार...

*राज्यातील बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; लालबागच्या राजा चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे साकडे*

63
0

*राज्यातील बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; लालबागच्या राजा चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे साकडे*

*मुंबई, दि. २३ सप्टेंबर -* राज्यातील बळीराजावर आलेले दुष्काळाचे संकट दूर कर, त्यांच्या पिकांना मुबलक पाणी मिळू दे आणि त्यांच्या कष्टाला चांगले फळ मिळून त्यांच्या जीवनात सुख-समृद्धीचे दिवस येऊ दे, असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी लालबागच्या राजाच्या चरणी घातले.

राज्यात निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सहकुटुंब मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

यावेळी विघ्नहर्त्या गणरायाने राज्यातील शेतकरी बांधवांना या संकटातून बाहेर पडण्याचे बळ द्यावे, राज्यात समाधानकारक पाऊस पडावा, पिकांचे नुकसान टळावे आणि बळीराजाचे जीवन सुखी व समृद्ध व्हावे, अशी मनोभावे प्रार्थना त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here