* *रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा – मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश*
**१३ व्या राज्य रस्ता सुरक्षा परिषदेत ‘गोल्डन अवर’ मध्ये उपचार, १०८ रुग्णवाहिका एकाच डिजिटल मंचावर आणण्याचा निर्णय; जाने-जुलै २०२६ मध्ये मृत्यूत ६% घट*
मुंबई, दि. 22 सप्टेंबर: राज्यातील रस्ते अपघात आणि मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १३ व्या राज्य रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत दिले.
मंत्रालयात झालेल्या या बैठकीला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, अपर मुख्य सचिव संजय सेठ, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
*बैठकीतील प्रमुख निर्णय:*
*१. पीएम-राहत योजना प्रभावी करा:* अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’ मध्ये तातडीने उपचार मिळावेत. योजनेत प्रति व्यक्ती दीड लाखांपर्यंत 7 दिवस कॅशलेस उपचार. पोलीस नोंद, उपचार मंजुरीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करा.
*२. १०८ व खासगी रुग्णवाहिका एकाच डिजिटल मंचावर:* अपघातस्थळी जवळची रुग्णवाहिका तातडीने पोहोचण्यासाठी एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म. रुग्णवाहिकेत कॅमेरा व दूरसंचार सुविधा, जेणेकरून डॉक्टरांना थेट मार्गदर्शन करता येईल. प्रत्येक ५० किमीवर सक्षम ट्रॉमा केअर सेंटर आणि हवाई रुग्णवाहिकेचे धोरण.
*३. रस्ता सुरक्षा लेखापरीक्षण:* रस्त्याच्या प्रत्येक टप्प्यावर ऑडिट. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीतील १०% निधी रस्ता सुरक्षेसाठी राखीव. ब्लॅक स्पॉट्सवर तातडीने उपाययोजना, महामार्गावरील अतिक्रमणे हटवा.
*४. ओव्हरलोड व प्रदूषणावर नियंत्रण:* ‘वे-इन-मोशन’ सेन्सरचा पथदर्शी प्रकल्प, ‘पोल्युशन चेक-इन-मोशन’ रिमोट सेन्सिंग यंत्रणा आणि PUC चे चलन प्रणालीशी लिंकिंग.
*५. ११जिल्ह्यात ‘झीरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट’:* नाशिक ग्रामीण, पुणे ग्रामीण, अहिल्यानगर, सोलापूर ग्रामीण, जळगाव, सातारा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, बीड, नागपूर ग्रामीण, कोल्हापूर आणि धुळे या ११ जिल्ह्यांमध्ये डेटा-आधारित कृती आराखडा.
*६% घट:* जानेवारी-जुलै 2026 मध्ये अपघाती मृत्यूंमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ६% घट. यामध्ये दुचाकीस्वार ६०% आणि पादचारी २२% असल्याने त्यांच्या सुरक्षेवर विशेष भर देण्याच्या सूचना.
*- MAI MEDIA 24*
—






















