Home मुंबई *राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना सरकार उदासीन, हेक्टरी ५० हजार आणि सरसकट कर्जमाफी...

*राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना सरकार उदासीन, हेक्टरी ५० हजार आणि सरसकट कर्जमाफी द्या – हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा*

64
0

*राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना सरकार उदासीन, हेक्टरी ५० हजार आणि सरसकट कर्जमाफी द्या – हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा*

  • *मुंबई, दि. १९ सप्टेंबर २०२६*

राज्यातील अनेक भागात दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे, दीड महिन्यापासून पावसाचा एक थेंबही नाही, शेतातील पिके करपून गेली आहेत. पण महायुती सरकारचे त्याकडे लक्ष नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत फक्त चर्चा होते, पण ठोस निर्णय घेतला जात नाही. शेतकरी संकटात असताना सरकार वेळकाढूपणा करत आहे, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष *हर्षवर्धन सपकाळ* यांनी केला आहे.

राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत, सरसकट कर्जमाफी द्यावी, अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा सपकाळ यांनी दिला आहे.

*सरकार संवेदनशील नाही – सपकाळ*

“भाजपा महायुती सरकार संवेदनशील नाही. शेतकरी संकटात होरपळून निघाला असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. कुंभमेळ्यात सीसीटीव्ही बसवण्यासाठी सरकार ३५० कोटी रुपये खर्च करते, पण शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची गरज असताना तोही निर्णय घेतला नाही. जनतेमध्ये महायुती सरकारबद्दल प्रचंड चीड आहे. अजून वेळ गेलेली नाही, सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून दसऱ्याच्या आधी भरीव मदत द्यावी,” असे सपकाळ म्हणाले.

*देशातील जनता संकटात असताना आत्मपूजा अयोग्य*

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त दिवे लावण्याच्या आवाहनावर टीका करताना सपकाळ म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ वर्षात काय दिवे लावले म्हणून त्यांच्या वाढदिवसाला दिवे लावण्याचे आवाहन केले? मोदींच्या काळात तरुणांना नोकऱ्या नाहीत, महिलात सुरक्षित नाहीत, शेतकरी संकटात आहे, अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. जनता संकटात असताना वाढदिवस साजरे करणे हे अशोभनीय आहे. सोने खरेदी करू नका, तेल कमी वापरा असे सांगणारेच वाढदिवसाला तेलाचे दिवे लावण्यास सांगणे हा दुटप्पीपणा आहे. हा आत्मपूजेचा प्रकार आहे.”

*निवडणूक आयोग भाजपाचा हस्तक*

“निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाचे हस्तक बनला आहे. SIR च्या माध्यमातून मतदानाचा हक्कच हिरावून घेतला जात आहे, हे लोकशाहीवरचे मोठे संकट आहे. निवडणूक आयोगाचा कारभार अराजकाकडे घेऊन जात आहे. याला काँग्रेसचा विरोध असून देशात लोकशाही नांदावी यासाठी काँग्रेस रस्त्यावरची लढाई लढत आहे,” असेही सपकाळ म्हणाले.

—

माऊली, हा लेख *”राजकारण”* कॅटेगरीत टाका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here