*मुंबई महापालिकेचा SIR साठी १०.८१ कोटींचा चुराडा! १३०४ ऑपरेटर्सच्या चुकांचा भुर्दंड मतदारांवर?*
-ॲड. संदेश कोंडविलकर*
*सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी*
मुंबई : SIR (Special Intensive Revision) साठी मुंबई महापालिकेने फक्त ४ महिन्यात १०.८१ कोटी रुपये खर्च केले आहेत. ३६ विधानसभा मतदारसंघात १३०४ डेटा एन्ट्री ऑपरेटर नेमण्यात आले होते.
मात्र, Enumeration Form अपलोड करताना या ऑपरेटर्सनी मोठ्या प्रमाणात चुका केल्याचा आरोप होत आहे.
*प्रारूप यादीतील घोळ :*
– चुकीची नावे व वय
– दुबार मतदारांची नावे
– मृत व्यक्तींची नावे अद्यापही यादीत
या चुकांमुळे अनेक मतदारांना नोटीसा येण्याची शक्यता असून, चुकीची नावे तशीच राहण्याची भीती व्यक्त होत आहे. याचा मनस्ताप सर्वसामान्य मतदारांना सहन करावा लागणार आहे.
*प्रश्न अनुत्तरित – हा घोळ निस्तरणार कोण?*
या पार्श्वभूमीवर सर्व मतदार, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आणि सोसायटी/चाळ कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबातील व परिसरातील मतदारांची नावे प्रारूप यादीत पुन्हा तपासून पाहावीत आणि काही दुरुस्ती असल्यास तात्काळ आपल्या BLO शी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
*ॲड. संदेश कोंडविलकर*
*सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी*
—
.





















