तरुणांचा राजकीय वापर काँग्रेसला महागात पडला – चंद्रशेखर बावनकुळे!
*मुंबई, दि. १५ सप्टेंबर २०२६ -*
राजस्थानच्या जनतेने काँग्रेसला चपराक दिली आहे. ‘वंदे मातरम्’ पूर्ण म्हणणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला जनतेने चांगलाच धडा शिकवला आहे, असे मत राजस्थान महापालिका प्रभारी व महसूलमंत्री *चंद्रशेखर बावनकुळे* यांनी व्यक्त केले.
*निकाल काय लागला?*
राजस्थानमध्ये ३१८ नगरपालिका, नगरपरिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या.
– त्यापैकी *२३९ ठिकाणी भाजपचे बोर्ड* स्थापन होणार आहेत!
– १० महानगरपालिकांपैकी *८ ठिकाणी भाजपचे महापौर* होणार आहेत!
– केवळ बिकानेर आणि अजमेर या दोन ठिकाणी भाजप थोडं मागे राहिला.
हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या *’विकसित भारत’* संकल्पनेवर जनतेचा विश्वास आहे, असे बावनकुळे म्हणाले.
ते म्हणाले, “काँग्रेसने Gen-Z / तरुणांचा राजकीय वापर करण्याचा प्रयत्न केला, पण जनतेने चुकीच्या नीतीला नाकारले.”
या विजयाचे श्रेय त्यांनी – पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन, राजस्थान CM भजनलाल शर्मा आणि महाराष्ट्र CM देवेंद्र फडणवीस यांना दिले.
*प्रीमियर कंपनी जमीन प्रकरणावर -*
कल्याणमधील जमीनवाटपाबाबत एसआयटी नेमली आहे. अहवाल आल्यानंतर विधानमंडळात स्पष्टीकरण देऊ, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
*✍️ MAI MEDIA 24*
#Bawankule #RajasthanElection #BJP #MAIMEDIA24
—





















