*`नमो एक्स्प्रेसच्या शिट्टीने दुमदुमला CSMT* – *१५०० हून अधिक भाविक कोकणाकडे रवाना,* *ऑगस्ट क्रांती मैदानातून ५ बसेसचे प्रस्थान*| MAI MEDIA
> *‘नमो एक्स्प्रेस’च्या शिट्टीने दुमदुमला सीएसएमटी – १५०० हून अधिक भाविक कोकणाकडे रवाना*
>
> *मुंबई, १२ सप्टेंबर -* गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील चाकरमान्यांना आपल्या गावच्या बाप्पाच्या दर्शनासाठी कोकणात जाता यावे, यासाठी लोढा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विशेष ‘नमो एक्स्प्रेस’ची व्यवस्था करण्यात आली.
>
> शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ वरून सकाळी ११ वाजून ५ मिनिटाने ट्रेन कोकणाकडे धावली. *मुंबई भाजप अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला* आणि ट्रेनमधून १५०० हून अधिक गणेशभक्त कोकणाकडे रवाना झाले.
>
> ‘नमो एक्स्प्रेस’ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडीपर्यंत धावणार असून गणेशोत्सवासाठी आपल्या गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
>
> छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर चाकरमान्यांनी मोठी गर्दी केली होती. हक्काचे आसन मिळाल्यानंतर गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले. विशेष रेल्वे रवाना होताच संपूर्ण स्थानक परिसर *‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.*
>
> गणेशोत्सव हा प्रत्येक मराठी माणसाच्या भावविश्वाशी जोडलेला सण आहे. मुंबईत नोकरी-व्यवसायानिमित्त राहणाऱ्या चाकरमान्यांना आपल्या गावच्या बाप्पाच्या दर्शनासाठी जाता यावे, हीच या उपक्रमामागची भावना आहे. हीच भावनिक नाळ लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी विशेष रेल्वे आणि बससेवेची व्यवस्था करण्यात येते. मुंबईतून कोकणाकडे रवाना होताना गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हीच या उपक्रमाची खरी पावती आहे, अशी माहिती *कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा* यांनी दिली.
>
> दरम्यान, शनिवारी रात्री ११ वाजता भाजपच्या वतीने आणखी एका विशेष ट्रेनचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ऑगस्ट क्रांती मैदान येथून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी पाच विशेष बस रवाना करण्यात आल्या. दक्षिण मुंबई परिसरातील सुमारे २०० चाकरमान्यांनी या बसमधून प्रवास केला.
>
> *- MAI MEDIA 24 | मुंबई प्रतिनिधी*
*📌 FB / Insta साठी Viral Caption:*
🚂 नमो एक्स्प्रेसच्या शिट्टीने दुमदुमला CSMT! 🚩
गणपती बाप्पा मोरया! 🙏
✨ १५००+ भाविक कोकणाकडे रवाना
✨ मुंबई भाजप अध्यक्ष आ. अमित साटम यांनी दाखवला हिरवा झेंडा
✨ CSMT ते सावंतवाडी – विशेष रेल्वे
✨ फलाट क्र. १८ वर ‘गणपती बाप्पा मोरया’ जयघोष!
✨ ऑगस्ट क्रांती मैदानातून ५ बसेस, २००+ भाविक रवाना
✨ लोढा फाउंडेशनचा दरवर्षीप्रमाणे स्तुत्य उपक्रम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन
कोकणातल्या बाप्पाच्या भेटीची ओढ! ❤️
सविस्तर वाचा – MAI MEDIA 24
#NamoExpress #CSMT #Kokan #Ganeshotsav #AmitSatam #MangalPrabhatLodha #MAIMEDIA24
*



















