`*कोकणच्या निसर्ग संवर्धनाला नवी दिशा! साखीणगावात ‘निसर्ग माहिती केंद्रा’चा शुभारंभ – पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ*
> *कोकणच्या निसर्ग संवर्धनाला मिळणार नवी दिशा; साखीणगावात ‘निसर्ग माहिती केंद्रा’चा शुभारंभ*
>
> *खेड / रत्नागिरी -* कोकणच्या समृद्ध निसर्गसंपदेचा वारसा जपत, निसर्ग संवर्धन आणि जनजागृतीला नवी दिशा देणाऱ्या *‘निसर्ग माहिती केंद्रा’चा* साखीणगाव, ता. खेड येथे दिमाखात शुभारंभ झाला.
>
> जिल्हा नियोजन योजना २०२४-२५ अंतर्गत उभारण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन *उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत* यांच्या हस्ते करण्यात आले.
>
> यावेळी व्यासपीठावर माजी आमदार संजय कदम, जिल्हा परिषद सदस्य राजू अमरे, उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वन संरक्षक प्रियांका लगड, तहसीलदार सुधीर सोनवणे, नगरसेवक निहार कोवळे, साखीणगाव संयुक्त व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर दिवाळे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
>
> *या केंद्रामुळे काय होणार?*
> ✅ कोकणातील जैवविविधतेची माहिती पर्यटकांना मिळणार
> ✅ विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षण
> ✅ स्थानिकांना रोजगार आणि पर्यटनाला चालना
>
> कोकणचा निसर्ग हाच खरा वैभव आहे, तो जपण्यासाठी हे केंद्र मैलाचा दगड ठरेल, असे मत यावेळी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केले.
>
> *- MAI MEDIA 24 | रत्नागिरी प्रतिनिधी*
*

















