Home Uncategorized `संगमेश्वरात कामगिरी बदल्यांचा खेळ? धामणीचा शिक्षक ३५ किमी दूर परचुरीत – सभापतींच्या...

`संगमेश्वरात कामगिरी बदल्यांचा खेळ? धामणीचा शिक्षक ३५ किमी दूर परचुरीत – सभापतींच्या गावात ‘खास’ सोय?

14
0

`संगमेश्वरात कामगिरी बदल्यांचा खेळ? धामणीचा शिक्षक ३५ किमी दूर परचुरीत – सभापतींच्या गावात ‘खास’ सोय? |

MAI MEDIA 24`
*

> *शिक्षकांच्या ‘लांबपल्ल्याच्या’ कामगिरी बदल्यांचा खेळ! धामणीचा शिक्षक ३५ किमी दूर खाडीपलिकडच्या परचुरी शाळेत; राजकीय दबावातून ‘खास’ सोय की नियमांची पायमल्ली?*
>
> *संगमेश्वर -* प्रशासकीय सोय आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचे गोंडस नाव देऊन संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक शिक्षण विभागात सध्या ‘कामगिरी बदल्यां’चा जो खेळ सुरू आहे, त्यावरून संपूर्ण तालुक्यात संशयाचे दाट ढग जमा झाले आहेत.
>
> राष्ट्रीय महामार्गावरील *धामणी येथील एका शिक्षकाला चक्क केंद्र क्षेत्र ओलांडून, तब्बल ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर, खाडीपलिकडच्या परचुरी येथील प्राथमिक शाळेवर* कामगिरीवर पाठवण्याचा पराक्रम शिक्षण विभागात घडला आहे.
>
> *विशेष म्हणजे, परचुरी हे गाव तालुका पंचायत समितीच्या सभापतींचेच गाव असल्याने,* ही बदली नक्की विद्यार्थ्यांच्या हितासाठी की कोण्या ‘खास’ व्यक्तीच्या सोयीसाठी? असा थेट सवाल आता लोकचर्चेतून उपस्थित केला जात आहे.
>
> सामान्यतः नियमानुसार कामगिरी बदली करताना जवळची शाळा, पटसंख्या आणि विद्यार्थ्यांची गरज यांचा विचार प्राधान्याने होणे अपेक्षित असते. मात्र, नियमांना बगल देऊन एका केंद्र क्षेत्रातून दुसऱ्या केंद्र क्षेत्रात एवढ्या दूरवर रवानगी करण्यात आली आहे.
>
> *पालकांचा सवाल -* शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित खरोखर जपले जात आहे की प्रशासकीय अधिकारांचा वापर करून विशिष्ट शिक्षकांची सोयरिक सांभाळली जात आहे?
>
> या संपूर्ण ‘लांबपल्ल्याच्या’ कामगिरी बदली प्रकरणाची जिल्हा परिषद प्रशासन आणि वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी व्हावी, तसेच संगमेश्वर तालुक्यातील अशा सर्वच नियमबाह्य व संशयास्पद कामगिरी बदल्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी आता सर्वस्तरातून होत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here