*ब्रिटनच्या संसदेत दुमदुमला “जय महाराष्ट्र” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्कार*
लंडन, दि. ९: ब्रिटनच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये आज “जय महाराष्ट्र”चा निनाद घुमला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भाषणाची सुरुवात ‘नमस्कार – जय महाराष्ट्र’ने करत शिंदे म्हणाले, “आई-पत्नीच्या काबाडकष्टातून सामाजिक विचारांची जडणघडण झाली. लाडकी बहीण योजनेमुळे करोडो बहिणी मिळाल्या.”
*कार्यक्रमाला* माजी फर्स्ट मिनिस्टर बॅरोनेस आर्लेन फॉस्टर, UK एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक उपस्थित होते.
शिंदे यांना ‘माझी लाडकी बहीण योजना’ आणि ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांसाठी हा सन्मान मिळाला.
ते म्हणाले, “महाराष्ट्र भारताच्या GDP मध्ये १४% वाटा देतो, ३०% FDI आकर्षित करतो. २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे लक्ष्य आहे. मुंबई-लंडन हे दोन्ही फिनटेक, ग्रीन एनर्जीमध्ये सहकार्य करू शकतात.”
पंतप्रधान मोदी हे व्हिजनरी लीडर असून भारत-ब्रिटन संबंध सुवर्णयुगात असल्याचेही ते म्हणाले.
—





















