*काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्विट*
नागपूरात संविधानिक मार्गाने मोर्चा काढणाऱ्या युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर नागपूर पोलिसांनी केलेली अमानुष कारवाई अत्यंत संतापजनक आहे. या कारवाईत शिवराज मोरे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आरएसएस मुख्यालयाकडे संविधानाची प्रत घेऊन जात असताना हेल्मेटधारी पोलिसांनी शिवराज मोरे यांचा गळा घोटला. संविधानाची प्रत हातात घेऊन चाललेल्या युवकाचा गळा घोटणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचाच प्रकार आहे.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीसांच्या शहरात, त्यांच्या इशाऱ्यावर लोकशाहीचा आवाज दाबला जात आहे. हा पोलिसांचा अत्याचार नाही तर हा सत्तेच्या अहंकाराचा नमुना आहे. सरकारचे पोलीस जनतेचे रक्षक नाही तर सत्तेच्या गुंडांची भूमिका बजावत आहेत.
पण लक्षात ठेवा, तुमच्या हा अहंकारी सत्तेचा माज जनता निश्चित उतरवेल…
https://x.com/incharshsapkal/status/2097660535810768996?s=46




















