*आजचा दिवस आपल्या सख्याचा आहे – जगतगुरु, सखा श्रीकृष्णाचा!
शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता – अशा शिक्षकांना त्रिवार वंदन!* – शीतल हरीश करदेकर
आज सुवर्ण कांचन योग जुळून आलाय – एकीकडे आपला सखा जगतगुरु श्रीकृष्ण आणि दुसरीकडे शिक्षक दिन! हा लेख आम्ही आमच्या सख्याला अर्पण करतो!
भगवान श्रीकृष्णाची तुलना कुणाशीही होऊच शकत नाही, कारण तोच जगनियंता आहे! पण तरीही तोच खरा प्रॅक्टिकल गुरु आणि खरा सखा होता आणि आहे.
भक्ती, कर्म आणि जगाचे तत्वज्ञान सांगणारा कृष्ण – त्याने आपल्या लाडक्या अर्जुनाचा सारथी बनणं पसंत केलं. स्वतः देव असूनही; धर्मरक्षणासाठी मैदानावर शत्रु कोणीही असो स्वतःच लढणं आवश्यक आहे हे त्याने दाखवून दिलं!
*याचा वर्तमान आणि कालातीत अर्थ काय?*
देव, धर्म, भक्ती कितीही महत्त्वाची असली, तरी यशाला शॉर्टकट नसतो! तिथे प्रत्यक्ष कृती आणि खरी मेहनतच आवश्यक असते!
हाच तर MAI MEDIA 24 चा *”एकच काम, पण प्रामाणिकपणे!”* चा मंत्र आहे!
‘आमचा सर्वात मोठा मंत्र – राष्ट्रहित सर्वप्रथम याचा अर्थ देशातील सर्वांचे हित!’ कोणत्याही एका जातीचे, धर्माचे, पक्षाचे नाही, तर देशातील प्रत्येक नागरिकाचे हित म्हणजेच राष्ट्रहित!
●डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन कोण होते आणि शिक्षक दिन का?●
भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्वज्ञ, शिक्षकांचे शिक्षक, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला.ते स्वतः एक महान शिक्षक होते.
एकदा त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी मागितली, तेव्हा ते म्हणाले – “माझा वाढदिवस वेगळा साजरा करण्यापेक्षा, ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला जास्त आनंद होईल!”
तेव्हापासून १९६२ पासून दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. त्यांनी सांगितलं होतं – “शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता असतो!”
१) ब्राह्मण्य म्हणजे ब्रह्म जाणणे: कृष्णाने गीता सांगितली, चाणक्याने राजा घडवला, शिवनीती गड-दुर्गातून शिकायची. शंकर-पार्वती-गणपती कथेमागे हत्तीचं शीर लावण्यामागे अनेक अर्थ आहेत – ते शिक्षकच सांगू शकतो.
२) क्षत्रियत्व म्हणजे प्रहार करणे:पाट्या टाकणारे घातकच! पेपर फोडणे, भ्रष्टाचार करून लायकी नसताना नोकऱ्या पळवणे म्हणजे अधर्म! भ्रष्ट आचार, विचार, कृती संवेदनाशून्य नागरिक घडवते.
३) समानता म्हणजे खरा धर्म: धर्मांधतेने राष्ट्र घडत नाही, वैराने हित साधता येत नाही, हे चांगला शिक्षकच सांगू शकतो. सर्वांना समान मानणं हाच खरा धर्म!
जो शिक्षक सत्य, प्रहार आणि समानता शिकवतो अशा शिक्षकांना त्रिवार वंदन!* 🙏🙏🙏
आणि म्हणूनच आमचा थेट सवाल –
– सरकारी नोकरीत राहून बाहेर धंदा? बंद!
– सत्याची बाजू सोडून जाहिरातीची दलाली? बंद!
– जनसेवा सोडून घराणेशाही? बंद!
– गाईड, कॉपी, रिलबाजी करून शायनिंग? बंद! खरा अभ्यास आणि ओरिजिनल संशोधनातून एकलव्य घडा!
जर राज्यातील मंत्र्यांना भेटायला वेगळे दरबार घ्यावे लागत असतील तर सरकारी यंत्रणा, कार्यालये काय कामाची?
जर IAS, IPS, आरोग्य, शिक्षण सेवेतील लोकांमध्ये वाळवी लागली तर भ्रष्टाचाराचे घडे भरभरून वाहणारच! भाट आणि अंध, मंद, स्वार्थी सल्लागार मालकाशीही प्रामाणिक नसतात! बुद्धिवंत, गुणीजन, दूरदृष्टी असलेले लोक टीममध्ये हवेत!
●MAI MEDIA 24 च्या दमदार सुधारणा:●
१) शिक्षक, सैनिक, शेतकरी, डॉक्टर, पत्रकार, श्रमिक यांना आर्थिक, सामाजिक दृष्ट्या मजबूत करा!
२) खाजगी कोचिंग, क्लासेस ही कीड आणि पाट्या टाकणे कायमचे बंद करा!
३) योग्यता नसलेले मंत्री हटवा! बुद्धिवंत, गुणीजन, दूरदृष्टी असलेले लोक टीममध्ये आणा!
४) सरकारी यंत्रणा सक्षम करा म्हणजे मंत्र्यांना दरबार घ्यावे लागणार नाहीत!
एकच निवडा – पण निवडल्यावर तिथे १००% घाम गाळा! प्रत्यक्ष कृती करा! श्रीकृष्णाने रथ हाकला, युद्ध केलं, गीता सांगितली – कर्म केलं! फक्त उपदेश नाही दिला!
आणि शेवटी लक्षात ठेवा –
●कितीही वाईट वागा, घाणेरडे राजकारण करा… हिशोब त्याच्याच हाती आहे लक्षात ठेवा!●
तो सखा श्रीकृष्ण सगळं पाहतोय! तो जगनियंता आहे! कर्माचा हिशोब तोच करणार आहे!
*आपल्या सख्याला हा लेख अपर्ण आणि अशा शिक्षकांना त्रिवार वंदन!*
*राष्ट्रहित सर्वप्रथम म्हणजे देशातील सर्वांचे हित!*
*जय जवान, जय किसान, जय श्रमिक, जय पत्रकार!*
*- शीतल हरीश करदेकर | MAI MEDIA 24*
*”सत्य – जे सर्वांना समान मानते”*
#SakhaShriKrishna #ShikshakHaRashtrachaNirmata #TriwarVandan #Radhakrishnan #MAIMedia24 #RashtrahitSarvapratham
—




















