Home उद्योग / शिक्षण वार्ता एडीसीएतर्फे अंडर १४ निवड चाचणीची दुसरी फेरी रविवारी ३०० खेळाडूंमधून ६०...

एडीसीएतर्फे अंडर १४ निवड चाचणीची दुसरी फेरी रविवारी ३०० खेळाडूंमधून ६० खेळाडूंची निवड करण्यात येणार

36
0

एडीसीएतर्फे अंडर १४ निवड चाचणीची दुसरी फेरी रविवारी

३०० खेळाडूंमधून ६० खेळाडूंची निवड करण्यात येणार

छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या १४ वर्षांखालील क्रिकेट निवड चाचणीसाठी मोठा प्रतिसाद लाभला आहे.
या निवड चाचणीत विक्रमी १३०० युवा क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला होता. या निवड चाचणीतून ३०० खेळाडूंची प्राथमिक निवड करण्यात आली. आता रविवारी (३० ऑगस्ट) निवड चाचणीची दुसरी फेरी सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे.
या चाचणीत ३०० खेळाडूंनाच सहभाग घेता येणार आहे, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव शिरीष बोराळकर यांनी दिली.

एडीसीए क्रिकेट मैदानावर गेल्या आठवड्यात तीन दिवसांची निवड चाचणी घेण्यात आली.
अंडर १४ गटात यंदा विक्रमी म्हणजे तब्बल १३०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या प्राथमिक निवड चाचणीतून ३०० खेळाडूंची निवड करण्यात आली. निवड चाचणीची दुसरी फेरी रविवारी सकाळी ९ वाजता एडीसीए मैदानावर सुरू होणार आहे.

या चाचणीतून ६० खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. त्यातून अंतिम अंडर १४ संघाची निवड केली जाईल. प्रत्येक खेळाडूला स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी किमान तीन सामने खेळण्याची थेट संधी मिळणार आहे. या चाचणीसाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंच्या नावांची यादी एडीसीए क्रिकेट मैदानावर कार्यालयात लावलेली आहे.
त्या यादीत ज्यांची नावे आहेत, त्याच खेळाडूंना दुसऱ्या निवड चाचणी प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे. असेही सचिव बोराळकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here