*MAI MEDIA 24 | EXCLUSIVE*
५० लाख देऊन मोकळे झाले… प्रेमाचा फुफाटा झाला – MPSC विद्यार्थ्याची जिव्हारी लागणारी व्यथा – श्रीकांत पवार
*मुंबई:* COEP पेपर फुटी प्रकरणानंतर राज्यभरातील MPSC करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या जखमा पुन्हा ओल्या झाल्या आहेत. एका ब्रेकअपने बिंग फोडलं आणि ५० लाखात पोस्ट विकली गेल्याचं समोर आलं.
या पार्श्वभूमीवर एका MPSC संघर्ष योद्ध्याने आपली व्यथा MAI MEDIA 24 कडे व्यक्त केली आहे.
*”१२-१५ तास अभ्यासाला बसून आम्ही पार जॅम झालो… मणके वाकले, डोळे खोबणीत गेले, मोठ्या नंबरचे चष्मे लागले…”*
मेसचं निखळ जेवण, आठवड्यातून एकदा मेस बंद म्हणून कधी ५ रुपयांचा वडापाव तर कधी ५ रुपयाचं बिस्कीट आणि घटाघटा पाणी पिऊन दिवस काढले.. तर कधी खिशात ५ रुपये सुद्धा नाही म्हणून उपाशी पोटी पाणी पिऊन अभ्यास करून दिवस काढले.
*”कित्येक वर्ष ना मेजवानी, ना वरात-लग्न, ना नातेवाईकांची भेट… वैराग्य आयुष्य सोसलं…”*
प्रेम तर आम्हीही केलं… अभ्यासावर, आई-वडिलांच्या संघर्षावर…
पण सट्टेबाजांनी पेपर आज थोडा फोडला! हे तर अनेक वर्षांपासून संघटितपणे सुरू होतं, म्हणून तर आम्ही अभ्यास करूनही अर्ध्या-एक मार्काने निवड यादीतून मागे पडलो….
*”आता तर बिंग फुटलं म्हणून आमचं हक्काचं कोणी-कोणी काय-काय लुटलं ते एका लफड्याने चव्हाट्यावर आणलं…”*
पण मी खूप संघर्षातून यशस्वी झालो
वरील सर्व शब्दांकन माझ्या वैयक्तिक आयुष्याची व्यथा आहे.
सध्या माझे वय ३९ वर्ष आहे.
मी वयाच्या ३० व्या वर्षी MPSC परीक्षा पास झालो मात्र यात माझी सात आठ वर्ष आणि अनेक त्रासदायक कालखंड गेला.
ही व्यथा आहे… प्रामाणिक प्रयत्न करत असताना यश-अपयश सोसलेल्या प्रत्येक MPSC करणाऱ्या उमेदवाराची.
*- एक MPSC संघर्ष योद्धा (श्रीकांत पवार)**
—























