शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चर्मोद्योग कामगार सेना व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने 41 वर्षांची परंपरा कायम राखत यंदाच्या वर्षी देखील मयुर चंद्रकांत कांबळे यांच्या द्वारे आषाढी एकादशी निमित्त वडाळा येथील प्रति पंढरपुर म्हणून ख्याती असलेल्या श्री विठ्ठल मंदिर येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबिर व विठ्ठल भक्तांना प्रसादाच्या लाडूचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई व विनायक राऊत, विभाग प्रमुख महेश सावंत, विभाग संघटिका श्रध्दा जाधव, पवन जाधव, माधुरी मांजरेकर, महेश यादव, भटु अहिरे, सीमा लोकरे, विनोद सातपुते, विठ्ठल मोरे, रुपेश कांबळे, अशोक बागडे यांच्यासह असंख्य निष्ठावंत शिवसैनिक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विठ्ठलभक्त उपस्थित होते.



















