Home मुंबई *दिवंगत गायक मुकेश यांच्या स्मृती जतनासाठी ‘मुकेश गौरव समिती’ स्थापन*

*दिवंगत गायक मुकेश यांच्या स्मृती जतनासाठी ‘मुकेश गौरव समिती’ स्थापन*

26
0

*दिवंगत गायक मुकेश यांच्या स्मृती जतनासाठी ‘मुकेश गौरव समिती’ स्थापन*
*५०व्या पुण्यतिथीनिमित्त शासनाचा निर्णय; मंत्री लोढा अध्यक्ष, नील नितीन मुकेश सदस्य*
*- प्रतिनिधी | Maimedia24 | मुंबई*

*मुंबई, २० ऑगस्ट:* भारतीय संगीत विश्वाला ‘कभी कभी मेरे दिल में’ सारखी कालातीत गाणी देणारे स्वरसम्राट स्वर्गीय गायक मुकेश यांच्या २७ ऑगस्ट २०२६ रोजी ५० व्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र शासनाने त्यांच्या स्मृती जतनासाठी ‘स्वर्गीय गायक मुकेश गौरव समिती’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात ही समिती स्थापन करण्यात येणार असून मुकेश यांच्या संगीत वारशाचे जतन, संवर्धन करण्यासोबतच नवोदित गायक-कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे समितीचे प्रमुख उद्दिष्ट असेल.

*मंत्री लोढा अध्यक्ष, नील नितीन मुकेश सदस्य*
या समितीच्या *अध्यक्षपदी* महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री *मंगल प्रभात लोढा* यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
समितीमध्ये शिवसेना गटनेता *अमेय घोले* आणि मुकेश यांचे नातू, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता *नील नितीन मुकेश* यांचा समावेश आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी हे *सदस्य सचिव* म्हणून काम पाहणार आहेत.

*नवोदित कलाकारांना मिळणार संधी*
समितीच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक उपक्रम राबवले जाणार आहेत.
*समितीचे प्रमुख उपक्रम:*
१. *गायन स्पर्धा* : नवोदित गायक व संगीत विद्यार्थ्यांसाठी विशेष स्पर्धा
२. *संगीत महोत्सव* : मुकेश यांच्या हिंदी व मराठी गीतांवर आधारित सांगीतिक संध्या व मैफिली
३. *शिष्यवृत्ती व पुरस्कार* : होतकरू युवा कलाकारांना प्रोत्साहन व आर्थिक मदत

याबत माहिती देताना अध्यक्ष मंत्री *मंगल प्रभात लोढा* म्हणाले, _”मुकेश यांनी आपल्या सुमधुर आवाजातून भारतीय संगीतविश्वात अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या समृद्ध संगीत वारशाचे जतन करून तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. समितीच्या माध्यमातून नवोदित गायक आणि कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले जाईल.”_

हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच मराठी गीतांच्या माध्यमातूनही मुकेश यांनी राष्ट्रीय एकात्मतेला योगदान दिले आहे. २७ ऑगस्ट रोजी त्यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here