Home पुणे *डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात रंगणार ‘श्रावण महोत्सव २०२६’ची भव्य...

*डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात रंगणार ‘श्रावण महोत्सव २०२६’ची भव्य पाककला स्पर्धा*

79
0

*डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात रंगणार ‘श्रावण महोत्सव २०२६’ची भव्य पाककला स्पर्धा*

पुणे.दि.१७: भारतीय खाद्यसंस्कृतीतील पारंपरिक चवी आणि पाककलेला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘श्रावण महोत्सव २०२६’ अंतर्गत भव्य पाककला स्पर्धेची पुणे प्राथमिक फेरी मंगळवारी (दि.२५ ऑगस्ट) आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या स्पर्धेमुळे पुणेकरांना पाककलेतील वैविध्यपूर्ण प्रयोगांची मेजवानी अनुभवता येणार आहे.

मिती ग्रुप आयोजित आणि उत्तरा मोने सादर करीत असलेल्या ‘श्रावण महोत्सवा’चे हे बारावे वर्ष आहे. यंदाच्या पाककला स्पर्धेसाठी स्पर्धकांना ‘कंदमुळापासून बनविलेला पदार्थ’ आणि ‘कोणत्याही प्रकारचे सूप’ हे दोन विषय देण्यात आले आहेत. पारंपरिक खाद्यपदार्थांना आधुनिक पाककलेची जोड देत सहभागी स्पर्धकांना आपल्या कल्पकतेचा आणि पाककौशल्याचा आविष्कार या स्पर्धेत सादर करता येणार आहे.

पुणे प्राथमिक फेरी मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता नारायण पेठेतील लोकमान्य सभागृह, टिळक वाडा, ५६८, नारायण पेठ, पुणे – ४११०३० येथे होणार आहे.

या पाककला स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी नावनोंदणीसाठी ९९३०११५७५९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
——

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here