Gen Alpha आता प्रश्न विचारतेय… आणि सत्तेला उत्तर द्यावेच लागेल!
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर-पेगलवाडी, गोहिरेवाडीतील विद्यार्थ्यांनी पाण्याच्या बाटलीचा माईक बनवून रस्त्यांच्या दुरवस्थेचे रिपोर्टिंग केले. रायगडच्या कोंडिवडे गावातील दोन विद्यार्थिनींनीही असाच अनोखा प्रयोग करून प्रश्न मांडले.
नागपूरच्या ग्रामीण भागात शाळेत जाण्यासाठी एसटी बस सुरू करा, अशी मागणी करणाऱ्या विद्यार्थिनी पुढे आल्या आहेत. तर हिंगोलीत आमचा सत्कार करण्यापेक्षा शिक्षक द्या असे ठणकावून सांगणाऱ्या मुली व्यवस्थेला आरसा दाखवत आहेत.
ही केवळ मुलांची छोटी-मोठी आंदोलने नाहीत. ही नव्या पिढीची जनजागृती आहे.
Gen Alpha ला ट्रोलिंग नको, हिंदू-मुस्लिम द्वेष नको, धमक्या नकोत, दंडेलशाही नको. त्यांना हवे आहेत चांगले रस्ते, शाळेत शिक्षक, सुरक्षित प्रवास, शिक्षण आणि मूलभूत सुविधा.
म्हणून सरकारनेही आता ठरवावे
मुद्द्यांवर बोलायचे की मुद्दे टाळण्यासाठी समाजाला भावनिक वादात अडकवायचे?
कारण ही पिढी प्रश्न विचारायला शिकतेय.
ती उत्तर मागतेय.
आणि तिच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, तर उद्या हीच पिढी मतपेटीतून सरसकट उत्तर देईल.
द्वेषाच्या राजकारणापेक्षा विकासाचे राजकारण करा.
या मुलांना गृहीत धरू नका शिक्षणाकडे आणि नागरी सुविधांकडे लक्ष द्या






















