Home मुंबई *जे जे सह महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांची , दोन तास काम बंद...

*जे जे सह महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांची , दोन तास काम बंद आंदोलन आणि निदर्शने*

7
0

सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संवर्गाचे सुधारित सेवा प्रवेश नियम, सुधारित आकृतीबंध ठप्प झालेली पदोन्नती प्रक्रिया या प्रमुख मागण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशन यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवार दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळात राज्यभर दोन तास काम आंदोलन करून निदर्शने करण्यात आली.
सुधारित सेवा प्रवेश नियम अंतिम नसल्यामुळे हजारो परिचारिका पदोन्नती पासून वंचित आहेत सुधारित आकृतीबंधास मान्यता न मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर पदनिर्मिती आणि पदभरती रखडली असून परिचारिका संवर्गावर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे असे मत संस्थेच्या सल्लागार श्रीमती कमल वायकोळे यांनी व्यक्त केले आहे.
रिक्त असलेली पदे त्वरित न भरल्यास तसेच परिचारिकांच्या संवर्गाच्या रखडलेल्या पदोन्नतीचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बृहन्मुंबई राज्य सरकारी परिचारिका संघटनेच्या सरचिटणीस कविता ठोंबरे यांनी दिला आहे.

आंदोलनाच्या प्रमुख मागण्या
1) सुधारित सेवा प्रवेश नियम तात्काळ अंतिम करावेत
2) सुधारित आकृतीबंधास त्वरित शासन मान्यता द्यावी
3) परिचारिका संवर्गातील सर्व प्रलंबित पदोन्नती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
4)रिक्त पदावरील वरील सरळ सेवा भरती त्वरित सुरू करा
5) परिचारिका संवर्गाच्या सर्व प्रलंबित सेवाविषयक प्रश्नावर कालबद्ध निर्णय घेण्यात यावा.

परिचारिका संवर्गाच्या या आंदोलनास बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस गणेश बकशेट्टी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

कमल वायकोळे, अध्यक्ष

कविता ठोंबरे, सरचिटणीस (9702580630)
बृहन्मुंबई राज्य सरकारी परिचारिका संघटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here