Home मुंबई वेटलीज बस चालकांसाठी बेस्ट कडून विशेष सुरक्षितता प्रशिक्षण मोहीम

वेटलीज बस चालकांसाठी बेस्ट कडून विशेष सुरक्षितता प्रशिक्षण मोहीम

82
0

माणखुर्द येथे नुकत्याच घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, दिनांक २४ जुलै २०२६ रोजी सर्व वेट लीज कंत्राटदरांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. त्यानुषंगाने, बेस्ट उपक्रमामार्फत बेस्ट मार्गावर कार्यरत असलेल्या सुमारे ५,२०० वेट लीज बस चालकांसाठी विशेष सुरक्षा जनजागृती व प्रशिक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमाचा उद्देश चालकांमध्ये सुरक्षित व संरक्षणात्मक (Defensive) वाहनचालना पद्धतींचा अवलंब वाढविणे तसेच रस्ते सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. प्रशिक्षणामध्ये लेन शिस्तीचे पालन, लेन कटिंग टाळणे, वेगमर्यादेचे काटेकोर पालन, सुरक्षित अंतर राखणे तसेच वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर पूर्णतः टाळणे आदी बाबींवर विशेष भर देण्यात येणार आहे.

ही मोहीम सर्व वेटलीज आगारामधे तसेच दिंडोशी प्रशिक्षण केंद्रामधेसुद्धा वेटलीज कंत्राटदार यांच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये विशेष करून समुपदेशन सत्रे, सुरक्षितता मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

वेस्ट व्यवस्थापनाने प्रवासी सुरक्षेसाठी आपली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित केली असून मर्व वेटलीज कंत्राटदार या मोहिमेत त्यांच्या चालकांचा सक्रिय सहभाग मुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. सातत्यपूर्ण प्रशिक्षण व जनजागृतीमुळे अपघातांमध्ये लक्षणीय घट होऊन मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल, असा विश्वाम वेस्ट प्रशासनाने व्यक्त केला आहे.

(र. म. मडावी)

सहाय्यक महाव्यवस्थापक (वाहतूक प्रवर्तन)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here