Home अग्रलेख नाना जगन्नाथ शंकरशेट -मुंबईचे शिल्पकार ,भारतीय रेल्वेचे जनक -शीतल हरीश करदेकर 

नाना जगन्नाथ शंकरशेट -मुंबईचे शिल्पकार ,भारतीय रेल्वेचे जनक -शीतल हरीश करदेकर 

45
0

नाना जगन्नाथ शंकरशेट -मुंबईचे शिल्पकार ,भारतीय रेल्वेचे जनक -शीतल हरीश करदेकर

मुंबईला रुळावर आणणारे जगञन्नाथ शंकरशेट.            जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे -जन्म : १० फेब्रुवारी १८०३, मुरबाड, ठाणे जिल्हा
पुण्यतिथी :३१ जुलै १८६५, मुंबई

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील थोर समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती आणि आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ शंकरशेट यांना ओळखले जाते. मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यात आणि तिचा पाया रचण्यात त्यांचे योगदान सर्वात महत्त्वाचे आहे.

●१. भारतीय रेल्वेचे जनक●
१६७ वर्षांपूर्वी १६ एप्रिल १८५३ रोजी दुपारी साडेतीन वाजता २१ तोफांच्या सलामीसह मुंबईतील बोरीबंदर म्हणजे आजचे सीएसएमटी येथून भारतातील पहिली रेल्वेगाडी ठाण्याच्या दिशेने धावली.
मुंबई ते ठाणे हा ३२ किलोमीटर*चा प्रवास या रेल्वेने फक्त ५७ मिनिटात पुर्ण केला.
या ऐतिहासिक प्रवासातील ४०० प्रवाशांमध्ये फुलांनी सजवलेल्या एका खास डब्यात बसण्याचा मान नाना शंकरशेट यांना मिळाला होता. ते पहिले भारतीय रेल्वे प्रवासी ठरले.
ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे कंपनीच्या स्थापनेपासून ते संचालक मंडळावर स्थान मिळवण्यापर्यंत नानांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

●२. शिक्षणाची क्रांती●
हिंदूंना आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी नानांनी माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्यासोबत मिळून बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ची स्थापना केली.
त्यांच्या प्रयत्नातून “एल्फिन्स्टन कॉलेज”आणि “ग्रँट मेडिकल कॉलेज’यांची स्थापना झाली.
●१८५७ मध्ये स्थापन झालेल्या ‘मुंबई विद्यापीठाच्या’ पहिल्या सिंडिकेटचे ते प्रमुख सदस्य होते.
ज्या काळात समाजात मुलींच्या शिक्षणाला विरोध होता त्या काळात नानांनी स्वतःच्या वाड्यात मुलींची शाळा सुरू केली.

●३. मुंबईचा पायाभूत विकास●
मुंबईला पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी नानांनी विहिरी आणि तलाव बांधले.
गॅस कंपनी सुरू करून त्यांनी मुंबईच्या रस्त्यांवर दिवे लावले.
आरोग्य आणि स्वच्छतेसाठी “म्युनिसिपल कमिटी’ स्थापन करण्यात त्यांचा पुढाकार होता ,जी पुढे मुंबई महानगरपालिका बनली.
●१८५२ मध्ये त्यांनी भारतातील राजकीय हक्कांची मागणी करणारी पहिली संघटना ‘बॉम्बे असोसिएशन’ स्थापन केली.
मुंबईच्या गव्हर्नरच्या कौन्सिलवर नियुक्त होणारे ते पहिले भारतीय सदस्य होते.अशा या मुंबईच्या शिल्पकाराला आणि भारतीय रेल्वेच्या जनकाला पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन `🙏`

जय महाराष्ट्र

–‘–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here