Home राजकीय उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधिमंडळात शालेय विद्यार्थ्यांशी साधला संवाद

उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधिमंडळात शालेय विद्यार्थ्यांशी साधला संवाद

252
0

*उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधिमंडळात शालेय विद्यार्थ्यांशी साधला संवाद*

मुंबई, दि. ८ जुलै – महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शालेय विद्यार्थ्यांनी विधिमंडळाला अभ्यास भेट दिली. भिवंडी महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या मराठी,उर्दू,तेलगू आणि हिंदी या चार माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी विधिमंडळाला भेट दिली.

यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधिमंडळातील उपसभापती कार्यालयात या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी या विद्यार्थ्यांचे शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होते.
सदर भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न डॉ. नीलम गोऱ्हे यांना विचारली, यावर डॉ. गोऱ्हे यांनी देखील विद्यार्थ्यांच्या या सर्व प्रश्नांची उत्तर दिली. खेळीमेळीच्या वातावरणात यावेळी हा संवाद विधिमंडळात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here