Home मुंबई विडी कामगारांना किमान वेतन मिळण्यासाठी सर्व कारखान्यावर खटले दाखल करा – हक्क...

विडी कामगारांना किमान वेतन मिळण्यासाठी सर्व कारखान्यावर खटले दाखल करा – हक्क समितीचा सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन

7
0

*विडी कामगारांना किमान वेतन मिळण्यासाठी सर्व कारखान्यावर खटले दाखल करा – हक्क समितीचा सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन*

विडी कामगारांना किमान वेतन मिळण्यासाठी तसेच जे कारखाना किमान वेतन देत नाहीत त्या प्रत्येक कारखान्यावर खटले दाखल करा या मागण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त यांना राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉ.गोवर्धन सुंचू यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र कामगार कामगार सेनेचे प्रदेश सचिव विष्णू कारमपुरी, नवमहाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष सायबण्णा तेगेळ्ळी, राष्ट्रीय विडी मजदूर संघाचे अध्यक्ष राहुल गुजर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉ. गोवर्धन सुंचू यांनी बोलताना म्हणाले की, किमान वेतना संबंधी अनेक बैठका झाले. किमान वेतन जाहीर करण्याचे देखील कामगार मंत्र्यांनी आश्वासन दिले. परंतु कुठे माशी जिंकले हेच कळत नाही. आपण सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त आहात आपलेही तेवढेच जबाबदारी आहे की वेळे कामगारांना न्याय मिळवून देण्याचे, आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. वास्तविक पाहता विडी कामगारांनी गेल्या 14 वर्षांपासून किमान वेतनापासून वंचित आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आजपर्यंत कुठलेही सहाय्यक कामगार आयुक्तांनी पुढाकार घेतले नाही. सध्या विडी कामगारांची विडी कारखान्यात मॅनेजरच्या संगनमताने त्यांचे कर्मचारी कडून प्रचंड पिळवणूक होत आहे.हे सर्व मालक लोकांना माहितीच राहत नाही हे विशेष. तरी सहाय्यक कामगार आयुक्तांना विनंती आहे की त्वरित विडी कामगारांना किमान वेतन मिळवून द्या, अन्यथा खटले दाखल करा. अन्यथा विडी कामगारांचे मुले मुली देखील आंदोलनात उतरल्यास कॉक्रोज आंदोलन प्रमाणे आंदोलन छेडावे लागेल. याची सर्वस्वी जबाबदार कामगार विभागाचे व प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी असा इशारा डॉ.गोवर्धन सुंचू यांनी दिले.यावेळी कामगार सेनेचे प्रदेश सचिव विष्णू कारमपुरी महाराज बोलताना म्हणाले की गेल्या अनेक महिन्यापासून किमान वेतन संबंधी सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त पुणे येथील अप्पर कामगार आयुक्त तसेच महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त बांद्रा कुर्ला शेवटी राज्याचे कामगार मंत्री यांच्या दालनात बैठक होऊन जुने कामगार संघटने व मालक संघ असे संयुक्त बैठकीवेळी मंत्री महोदयांनी स्वतः सांगितले की 23 जून रोजी किमान वेतन जाहीर करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून आपण स्वतः देखील उपस्थित होता तरी त्वरित विडी कामगारांना किमान वेतन मिळवून द्या .अन्यथा सर्व कारखान्यावर खटले दाखल करा. असे कारमपुरी महाराज यांनी व्यक्त केले.
यावेळी नवमहाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष सायबण्णा तेगेळ्ळी व राष्ट्रीय मजदूर संघ अध्यक्ष राहुल गुजर यांनी देखील त्यांची भावना सहाय्यक कामगार आयुक्त पुढे व्यक्त केले.
सदर प्रसंगी रेखा आडकी, इप्पा, सुवर्णा चेनमल,लक्ष्मी कोंडले, अमिना शेख, शमीन शेख, जरीना शेख, परविन पटेल,विठ्ठल कुराडकर, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, सत्यनारायण बल्ला, शारदा गुंडेटी, विष्णू गुंडेटी, लक्ष्मीबाई नल्ला,यांच्यासह बिडी कामगार बंधू भगिनी उपस्थित होते
******************************
फोटो मॅटर
========
किमान वेतन हक्क समितीच्या वतीने सरकारी कामगार अधिकारी श्री जयदीप मगर यांना निवेदन देण्यात आले सदर प्रसंगी डॉक्टर गोवर्धन संचू विष्णू कारमपुरी (महाराज) साहेबन्ना तेग्गेळी,राहुल गुजर, व बिडी कामगार बंधू-भगिनी दिसत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here