Home मुंबई *कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा काळा घोडा परिसरात संगम*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

*कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा काळा घोडा परिसरात संगम*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

28
0

• *काळा घोडा आर्ट एवेन्यू सुशोभीकरण कामांचे लोकार्पण*

मुंबई, दि. 14 : मुंबईचे वैभव असलेल्या काळाघोडा परिसरातील रस्त्यांचे अत्यंत उत्तमरित्या सुशोभीकरण करण्यात आले आहे. सुशोभीकरण कामातून कलात्मक व तत्कालीन वास्तुकलेशी समरसता जपण्यात आली आहे. कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा झालेल्या संगमातून या परिसराचे नवे रूप नागरिकांना अनुभवता येणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते काळा घोडा आर्ट एवेन्यू सौंदर्यीकरण कामांचे लोकार्पण काळा घोडा प्लाझा, बी. भरूचा मार्ग येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

नागरिकांसाठी असलेली ही व्यवस्था ‘हेरिटेज वॉक’ आहे. येथील पाथ वे आणि प्रत्येक जागेला कलात्मक स्पर्श करण्यात आला आहे. अत्यंत सुंदर व्यवस्था आहे त्याच शिस्तीमध्ये सुरू राहावी, यासाठी येथे येणारे नागरिक, येथील व्यावसायिक यांनी दक्षता घ्यावी, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार, महापौर रितू तावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, मनपा विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर, सभागृह नेते गणेश खणकर, नगरसेवक हर्षिता नार्वेकर, बृन्हमुंबई महानगर पालिका आयुक्त अश्विनी भिडे, बृन्हमुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे,आदी उपस्थित होते.

*थोडक्यात काळा घोडा परिसर सुशो‍भीकरण..*
दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसर युनेस्कोच्या ‘व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको आसम्बल ऑफ मुंबई‌’ या जागतिक वारसा स्थळाला लागूनच असल्यामुळे मुंबईकरांना हेरिटेज वॉकचा आनंद घेता यावा, यासाठी पाच रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामध्ये परिसरातील साईबाबा मार्ग, रोप वॉक लेन, डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग, फोर्ब्स स्ट्रीट, रुदरफोर्ड स्ट्रीट व बी. भरुचा मार्ग या रस्त्यांच्या समावेश आहे. येथे संग्रहालये, कला दालने व ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारती आहेत. दरवर्षी भरविला जाणारा काळा घोडा कला महोत्सव या परिसराची सांस्कृतिक ओळख आहे.
बी. भरूचा मार्गावरील चौकात ‘प्लाझा‌’ साकारण्यात आला असून करडा आणि काळा ग्रॅनाईट तसेच बेसॉल्ट फरशीचा यासाठी वापर करण्यात आला आहे.
या प्लाझाजवळ टेबल-खुर्चीवर बसून मुंबईकर, पर्यटक या परिसराचा, येथील स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेवू शकणार आहेत. आकर्षक स्ट्रीट आर्ट भित्तिचित्रे आणि सार्वजनिक बसण्याच्या खास जागा देऊन अधिक पादचारी-स्नेही मार्ग बनविण्याता आला आहे.
000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here