मुंबई, दि. ८ जुलै २०२६ : संगमनेर येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) स्थापन व्हावे, या अनेक वर्षांपासूनच्या सातत्यपूर्ण मागणीला आता नव्या शासन निकषांमुळे नवी दिशा मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांची भेट घेऊन संगमनेर, अकोले तसेच आजूबाजूच्या परिसराचा विचार करून नव्या निकषांनुसार स्वतंत्र RTO कार्यालयास मंजुरी द्यावी, अशी मागणी केली.
यावेळी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देत नव्या शासन अध्यादेशातील निकषांनुसार संगमनेरसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा प्रस्ताव सकारात्मकरीत्या तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.
संगमनेर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी, शैक्षणिक आणि वाहतूक केंद्र असून येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी-विक्री होते. मात्र, वाहन नोंदणी, वाहन परवाने, कर आणि इतर परिवहन सेवांसाठी संगमनेर, अकोले तसेच परिसरातील नागरिकांना दूरवरच्या RTO कार्यालयांमध्ये जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो.
याच पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने हा प्रश्न शासनाच्या विविध स्तरांवर मांडला आहे.
*चौकट*
*या मागणीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा :*
📌 २४ मार्च २०२५ : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संगमनेरसाठी स्वतंत्र RTO कार्यालयाची मागणी करण्यात आली. त्यावेळी काही तांत्रिक कारणांमुळे स्वतंत्र RTO ऐवजी स्वतंत्र कॅम्प ऑफिस मंजूर करण्यात आले. मात्र, ते अद्याप कार्यान्वित झाले नसल्याने कॅम्प ऑफिस तातडीने सुरू करावे आणि पुढे संगमनेर–अकोलेसाठी स्वतंत्र RTO मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली.
https://x.com/i/status/1904127487304720654
📌 जुलै २०२५ (पावसाळी अधिवेशन) : विधान परिषदेत संगमनेर, अकोले व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) स्थापन करण्याचा प्रश्न पुन्हा प्रभावीपणे उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
https://x.com/i/status/1944039789176430680
संगमनेर आणि परिसरातील लाखो नागरिकांना अधिक कार्यक्षम, सुलभ आणि जवळच्या ठिकाणी परिवहन सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हा पाठपुरावा अंतिम निर्णय होईपर्यंत सुरूच राहणार असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले.



















