Home मुंबई महाराष्ट्र सदनातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याकडे राज्यसरकारने लक्ष द्यावे – विजय...

महाराष्ट्र सदनातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याकडे राज्यसरकारने लक्ष द्यावे – विजय वडेट्टीवार यांची मागणी

142
0

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा बसवला आहे. यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने लक्ष घालावे आणि कोल्हापुरातील दसरा चौकात जसा पुतळा आहे तसा बसवण्यात यावा अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली .

राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात श्री. वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडला त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र सदनातील राजर्षी शाहू महाराजांच्या वडेट्टीवार यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शाहू महाराजांचेच वंशज संसदेत खासदार झाले आहेत. त्यांचेही मत याबाबत घेतले जाईल. याबाबत आम्ही तपासून दुरुस्ती करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here