Home महाराष्ट्र लाडकी बहिण योजनेच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे व महिलांचे मदतीसाठी...

लाडकी बहिण योजनेच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे व महिलांचे मदतीसाठी हेल्प डेस्क करावा- डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

186
0

राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात त्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. परंतु सेतूमध्ये एजंटकडून नोंदणी करता 200, 500, 700 रुपये अशी ग्रामीण भागातल्या गरीब लोकांकडून घेत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली असून, त्यांची फसवणूक होत असल्याचामुद्दा आमदार अमोल मिटकरी यांनी सभागृहात मांडला.
अमरावती जिल्ह्यातील वरूड या ठिकाणी हा प्रकार कॅमेरात कैद झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच काही लाभार्थ्यांकडून ही माहिती फोनवरून प्राप्त झाली असल्याचं ते म्हणाले. यावेळी शासनाने याची दाखल करून याबाबत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी विनंती त्यांनी शासनास केली.
यावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या गंभीर प्रश्नाबाबत अशा गोष्टी स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा स्थानिक प्रशासन यांच्या निदर्शनास हे आणून द्यावे.तसेच महिलांना मार्गदर्शनसाठी सर्व कार्यालयात हेल्पडेस्क निर्माण करावा असे निर्देश डॉ गोऱ्हे यांनी शासनास दिले.

यावरती मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी तालुक्यात तीन अशासकीय जणांची समिती नेमणार असून ही समिती या योजनेतील सर्व गोष्टी सनियंत्रित करतील अशी माहिती संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here