Home मुंबई अंबादास दानवे यांचे विधान परिषदेतील गैरवर्तनाबद्दल ५ दिवसांसाठी निलंबन – डॉ नीलम...

अंबादास दानवे यांचे विधान परिषदेतील गैरवर्तनाबद्दल ५ दिवसांसाठी निलंबन – डॉ नीलम गोऱ्हे

173
0

आमदार अंबादास दानवे, विरोधी पक्ष नेते यांनी सभागृहात चर्चा करीत असताना सभागृहाचे सन्माननीय सदस्य . प्रसाद लाड यांचेप्रती अत्यंत आक्षेपार्ह, अशोभनीय व अश्लाघ्य अपशब्द वापरुन व बेशिस्त वर्तन करुन विधानपरिषद सभागृहाची प्रतिष्ठा मलीन केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला आहे.
त्यांच्या या अतिशय असभ्य, बेशिस्त व संसदीय प्रथा, परंपरा व शिष्टाचारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या अशिष्ट वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रथांचे अवमूल्यन होऊन सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पायंडा पडेल. सबब त्यांच्या या अत्यंत बेशिस्त व अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेण्यात येत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना २०२४ च्या तृतीय (पावसाळी) अधिवेशनात ५ दिवसांकरीता निलंबित करण्यात येत आहे असे विधान परिषद सभागृहात जाहीर करत आहे असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केले

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here