Home मुंबई *न्यायालयाच्या या निर्णयामुळे पिडीतेला व तिच्या कुटुंबियांना खरोखरच न्याय मिळाला;न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक...

*न्यायालयाच्या या निर्णयामुळे पिडीतेला व तिच्या कुटुंबियांना खरोखरच न्याय मिळाला;न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार*

46
0

मुंबई दि. २९ जून – नसरापूर प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली असून न्यायालयाच्या या निर्णयामुळे पिडीतेला व तिच्या कुटुंबियांना खरोखरच न्याय मिळाला आहे शिवाय या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करतानाच न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी मनापासून स्वागत केले आहे.

 

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडीवर अत्याचार करुन अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. अवघ्या दोन महिन्यात घटनेची सुनावणी घेऊन निर्णय दिलेला हा पहिलाच खटला ठरला आहे असेही सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या.

अशा क्रूर विकृताला समाजात कोणतेही स्थान नाही. या निकालामुळे कायद्याचा धाक निर्माण झाला असून असे कृत्य पुन्हा करण्यास नराधम धजावणार नाहीत असे सांगतानाच निष्पाप मुलींना व महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी तपास यंत्रणा व सरकार नेहमीच पाठीशी उभे आहे असा विश्वास सुनेत्रा अजित पवार यांनी दिला.

या प्रकरणामध्ये वकीलांनी चांगल्या पध्दतीने काम केले असून त्यांचे सुनेत्रा अजित पवार यांनी मनापासून आभार मानले आहे.

भविष्यात महिलांना, मुलींना तसेच बालकांच्या सुरक्षिततेसाठी सरकार कठोरातील कठोर पाऊले उचलेल असा विश्वास देतानाच आम्ही सर्वजण पिडीत कुटूंबाच्या दुःखात त्यांच्या पाठीशी आहोत. अशा घटना पुन्हा – पुन्हा घडू नयेत यासाठी समाज आणि सरकार एकत्रितपणे ठोस पावले उचलेल असेही सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.

दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी तातडीने पावले उचलली व विशेष तपास पथक स्थापन करुन पिडीतेला न्याय मिळवून दिला त्याबद्दलही सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here