Home मुंबई *होर्डिंगसाठी 63 झाडांची बेकायदेशीर छाटणी करणाऱ्या होर्डिंग कंपनीवर एफआयआर दाखल करा*

*होर्डिंगसाठी 63 झाडांची बेकायदेशीर छाटणी करणाऱ्या होर्डिंग कंपनीवर एफआयआर दाखल करा*

15
0

*मुंबई उपनगर पालकमंत्री एँड. आशिष शेलार यांचे निर्देश*

मुंबई, दि. 11 जून 2026
अंधेरी (पश्चिम) येथील न्यू लिंक रोड परिसरात जाहिरात फलकांना स्पष्ट दृश्यता मिळावी यासाठी तब्बल 63 झाडांची अनधिकृतपणे छाटणी करण्यात आल्याचा गंभीर बाब स्थानिक नगरसेवक रुपेश सावारकर यांनी पालकमंत्री तथा माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री मा. आशिष शेलार यांच्याकडे लेखी तक्रार करून लक्षात आणून दिली. या प्रकरणी संबंधित जाहिरात कंपनीवर त्वरित एफआयआर दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

न्यू लिंक रोड परिसरातील जाहिरात फलकांकरिता झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात छाटण्यात आल्या. ही बाब आज उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत स्थानिक नगरसेवक रुपेश सावरकर यांनी मांडली. याबाबत पालकमंत्र्यांनी विचारणा केली असता महापालिका अधिकाऱ्यांनी झाडे छाटणी करण्यात आल्याचे मान्य करीत याबाबत आम्ही परिमंडळ कार्यालय आणि आंबोली पोलीस ठाणे यांच्याकडे प्राथमिक तक्रार केल्याचे सांगितले. मात्र एफआयआर दाखल झालेला नाही ही बाब नगरसेवक रुपेश सावरकर यांनी लक्षात आणून दिली.

त्याची दखल घेऊन, मंत्री आशिष शेलार यांनी संबंधित जाहिरात परवानग्यांची तपासणी करून दोषी जाहिरात कंपनीवर तातडीने एफआयआर दाखल करा, असे निर्देश पोलीसांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here