Home मुंबई *शहाजी बापू पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयास पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट; विधान...

*शहाजी बापू पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयास पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट; विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा*

20
0

सांगोला, दि.10 जून 2026 : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. जयकुमारजी गोरे यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते मा. श्री. शहाजी (बापू) पाटील यांच्या सांगोला येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयास भेट दिली.

यावेळी सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक २०२६ साठी महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. राजेंद्र राऊत यांच्यासह उपस्थित मान्यवरांशी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. महायुतीचा विजय सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेले संघटनात्मक नियोजन, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील समन्वय तसेच निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

या प्रसंगी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. रणजितसिंह (दादा) नाईक निंबाळकर, आमदार श्री. समाधान (दादा) आवताडे, माजी आमदार श्री. राम सातपुते, सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती श्री. चेतनसिंह केदार-सावंत, तसेच नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधींशी समन्वय वाढविण्यावर भर देण्यात आला.

000 00

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here